पैशाच्या वादातून मुलाकडून आईचा खून

By Admin | Updated: July 7, 2017 03:32 IST2017-07-07T03:32:51+5:302017-07-07T03:32:51+5:30

सुदवडी- शिंदेवस्ती (ता. मावळ) येथे एका तरुणाने आईचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला असून खुनाच्या आरोपाखाली तरुणाला

Mother's blood from the promise of money | पैशाच्या वादातून मुलाकडून आईचा खून

पैशाच्या वादातून मुलाकडून आईचा खून

लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव दाभाडे : सुदवडी- शिंदेवस्ती (ता. मावळ) येथे एका तरुणाने आईचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला असून खुनाच्या आरोपाखाली तरुणाला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पैशाच्या वादातून दारूच्या नशेत मुलाने झोपलेल्या आईच्या तोंडावर उशी दाबून खून केला. ही घटना गुरुवारी (दि. ६) पहाटे दोनच्या सुमारास सुदवडी येथील शिंदे वस्तीत घडली.
सीताबाई यशवंत शिंदे (वय ६५ , रा. शिंदे वस्ती, सुदवडी, ता. मावळ) असे खून झालेल्या आईचे नाव आहे.
प्रमोद यशवंत शिंदे (वय २७, रा. शिंदे वस्ती, सुदवडी, ता. मावळ) असे आरोपी मुलाचे नाव आहे.
पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आई सीताबाई शिंदे तिचा मुलगा प्रमोद शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी शेत जमीन विकून घर बांधले होते.
प्रमोद शिंदे याला दारूचे व्यसन असल्याने त्याचे पैशावरून आईशी घरात वारंवार खटके उडत असे. गुरुवारी (दि. ६) पहाटे २ च्या सुमारास आई सीताबाई शिंदे या गाढ झोपलेल्या असताना मुलगा प्रमोद शिंदे याने तिच्या तोंडावर उशी दाबून मारहाण केली. यात त्या दुर्दैवी मातेचा करुण अंत झाला.
सीताबाई शिंदे या विधवा असून त्यांना दोन मुले आहेत. त्या एकत्रितपणे राहत होत्या. आरोपीचा भाऊ किरण शिंदे यांनी खुनाची फिर्याद तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. आरोपीला शुक्रवारी वडगाव न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Web Title: Mother's blood from the promise of money