शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सासू-सासऱ्यांना कारने उडवून दांडक्याने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 23:22 IST

पराक्रमी जावयाचा प्रकार : पळून जाताना दुचाकीस्वाराला उडविले

उरुळी कांचन : आपल्या मुलीचा सासरी वारंवार छळ करीत मारहाण करणाऱ्या जावयाविरोधात पोलिसांत तक्रार देण्यासाठी निघालेल्या सासू-सासऱ्यांच्या दुचाकीला आपल्या चारचाकी वाहनाने धडक देऊन रस्तावर पडलेल्या सासू-सासºयांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून जबर जखमी करण्याचा प्रकार पराक्रमी जावयाने केल्याची घटना उरुळी कांचन - डाळिंब रस्तावर उरुळी कांचन (ता. हवेली) गावच्या हद्दीत शुक्रवारी (दि. २९) घडली. मारहाण करताना शेजारील नागरिक संतप्त होऊन अंगावर धावल्याने आपली सुटका करून घेण्याचा नादात या जावयाने पुन्हा एका दुचाकीस्वाराला आपल्या चार चाकीने उडवून गंभीर जखमी केले आहे.

या प्रकरणी शिवाजी आनंता म्हस्के (वय ५५, रा. डाळिंब , ता. दौंड) यांंनी आपल्या जावयाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या हल्लात सविता शिवाजी म्हस्के (वय ५०, रा. डाळिंब, ता. दौंड) या गंभीर जखमी झाल्या आहेत. तर, कारने धडक देऊन सोमनाथ दादा तुपसौंदर (वय ४०, रा. खुडावस्ती, डाळिंब, ता. दौंड) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी आमोल परशुराम महाडिक (वय ३६, रा. काळेशिवारवस्ती, शिंदवणे, ता. हवेली) या जावयाविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार शिवाजी म्हस्के यांची मुलगी उज्ज्वला यांचा विवाह अमोल महाडिक यांच्याशी झाला आहे. अमोल हा आपल्या पत्नीला वारंवार मारहाण करीत तिचा छळ करीत होता. यामुळे शुक्रवारी (दि. २९) सासरे शिवाजी म्हस्के व सासू सविता हे उरुळी कांचन पोलीस दूरक्षेत्रात तक्रार देण्यासाठी सकाळी साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून उरुळी कांचनच्या दिशेला निघाले. सासू-सासरे तक्रार करणार असल्याची कुणकुण लागताच जावई अमोल महाडिक हा त्याच्या मोटारकारने उरुळी कांचन-डाळिंब रस्तावर येऊन सासू-सासºयांचा दुचाकीला कारने जोरदार धडक देऊन दोघांना रस्त्यावर पाडले. त्यानंतर गाडीतून काढलेल्या लाकडी दांडक्याने सासू-सारसºयांना मारहाण केली. रस्त्यावर हा मारहाणीचा प्रकार झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोपी अमोल महाडिक याचा अंगावर धाव घेतल्याने कार चालू करून पळण्याचा प्रयत्नात रस्त्यावर समोरून येणारे सोमनाथ दादा तुपसौंंदर यांना १०० फूट अंतरावर कारने उडवून महाडिक पळाला. या धडकेत तुपसौंंदर हे जखमी झाले आहेत. नागरिकांनी तत्काळ जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी