शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आई व्हीलचेअरवर, पाय चालत नाहीत; पण लेकाने केला विठुरायाचे दर्शन घडविण्याचा निश्चय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 13:46 IST

मागील चार वर्षांपासून ४९ वर्षीय माऊली नाईक आपल्या आईला चालता येत नसल्यामुळे व्हीलचेअर आळंदी ते पंढरपूर वारी करत आहे

पुणे: भाळी चंदनाचा टिळा.. गळ्यात तुळशीच्या माळा.. डोक्यावर तुळशी वृंदावन अन् टाळ-मृदंगाच्या गजरात मुखी ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात तल्लीन झालेल्या वैष्णवांचा मेळा शुक्रवारी शहरात दाखल झाला आणि अवघा रंग एकचि झाला, याची प्रचिती आली. जात, धर्म, पंथ असा सर्व भेद विसरून पुणेकरांनी संतांच्या सेवेत वाहून घेतले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यातील संचेती चाैकात दाखल होताच शहरात चैतन्य संचारले. ‘चला पंढरीसी जाऊ । रखुमादेवीवरा पाहूं ॥ डोळे निवतील कान । मना तेथें समाधान.. हा ध्यास मनी बाळगत विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेल्या वैष्णवांचा लाखोंचा मेळा शहरात दाखल झाला.

या लाखो वारकऱ्यांमध्ये मागील चार वर्षांपासून ४९ वर्षीय माऊली नाईक आपल्या आईला चालता येत नसल्यामुळे व्हीलचेअर आळंदी ते पंढरपूर वारी करत आहे. मूळ मराठवाड्यातील असलेले माउली आईविषयी सांगतात, आईने ती लहान असल्यापासून वारीमध्ये मोठ्या भक्तिभावाने सहभागी होते. आई मुक्ताबाई यांचे वय सध्या ९५ असून, तिला चालता येत नसल्यामुळे तिची इच्छा मी पूर्ण करत आहे.

व्हीलचेअरवर बसलेल्या आईला हाताने ढकलत पांडुरंगाच्या दर्शनासाठी संपूर्ण वारीचा प्रवास करणार आहे. अशा प्रकारे आईला व्हीलचेअरवरून नेऊन दर्शन घडवण्याच्या या घटनेने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू उभे केले. उपस्थित भाविकांनी दोघांचं स्वागत केलं आणि हा प्रेमाचा, भक्तीचा क्षण मोबाइलमध्ये टिपण्याचा मोह अनेकांना आवरला नाही. मुक्ताबाई म्हणाल्या, पाय चालत नाहीत; पण लेकराने मला हाताने पांडुरंगाचे दर्शन घडविण्याचा निश्चय केला आहे. यापेक्षा मोठं भाग्य कोणतं अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :Puneपुणेashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025PandharpurपंढरपूरSenior Citizenज्येष्ठ नागरिकSocialसामाजिकAlandiआळंदी