शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

कौटुंबिक वादातून सासू-सासऱ्यांनी जावयालाच पेटवले; पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 11:18 IST

प्लास्टिकच्या बाटलीत आणलेले पेट्रोल जावयाच्या अंगावर टाकून पेटवून दिले...

पुणे : पती-पत्नीतील वादामुळे ते वेगळे राहत हाेते. त्यावरून सासू-सासऱ्यांनी जावयाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यात जावई गंभीर भाजला आहे.

याबाबत लखन बाजीराव काळे (वय ३२, रा. शिरूर) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना खराडीमधील रिलायन्स मॉलकडून खराडीकडे जाणाऱ्या रोडवर शुक्रवारी सायंकाळी घडली. चंदननगर पोलिसांनी सासरे रंजित ऊर्फ गेंड्या याजिंदर भोसले, सासू बासुंदी रंजित ऊर्फ गेंड्या भोसले, साडू अलताफ विजय काळे, पत्नी पेडम लखन काळे, मेहुणा कावकर रंजित ऊर्फ गेंड्या भोसले (सर्व रा. झेन्सार कंपनीसमोर, खराडी) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नाेंदवला.

अधिक माहितीनुसार, लखन काळे व त्याची पत्नी पेडम यांच्यात कौटुंबिक वाद आहे. त्यामुळे त्याची पत्नी, मुलगा व मुलगी हे फिर्यादी सोबत राहत नाहीत. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू होता. शुक्रवारी सायंकाळी लखन हे झाडाखाली बसले असताना त्याचे सासू-सासरे व इतर तेथे आले. पत्नीस नांदवीत नसल्यावरून लखन यांना मारहाण केली. प्लास्टिकच्या बाटलीत आणलेले पेट्रोल लखन यांच्या अंगावर टाकून पेटवून दिले. त्यात लखन यांचे पोट, पाठ, गळा, छाती व दोन्ही हात भाजले. पोलिस निरीक्षक जानकर अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस