शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

आई, आजीने अल्पवयीन मुलीची घरीच केली प्रसूती; पुण्यातील धक्कादायक प्रकार

By विवेक भुसे | Updated: October 17, 2022 10:38 IST

नागरिकांच्या दक्षतेने उघडल्यावर टाकलेल्या अर्भकाचा जीव वाचला

पुणे : इंस्टाग्रामवरुन झालेल्या ओळखीतून एका अल्पवयीन मुलीचा तरुणाशी संबंध आला. त्यातून ती गर्भवती राहिली. आईने हा प्रकार सर्वांपासून लपवून ठेवला. मुलीची घरीच प्रसृती केली. मात्र, लोकलज्जेस्तव नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला त्यांनी कचर्‍याजवळ टाकून दिले. नागरिकांच्या दक्षतेमुळे हा प्रकार समोर आला. उत्तमनगर पोलिसांनी तातडीने हा अर्भकाला हॉस्पिटलमध्ये नेल्याने त्याचा जीव वाचला. राज्य महिला आयोगाने याची दखल घेऊन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.  याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी पोस्कोसह दोन गुन्हे दाखल केले आहेत.

याबाबतची माहिती अशी, कोंढवे धावडे परिसरातील एका १७ वर्षाच्या मुलीचे इस्ट्राग्रामवरुन एका तरुणाशी ओळख झाली. त्यातून त्यांचे शारीरीक संबंध निर्माण झाले. मुलीला त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात नेले़ तेव्हा डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले. परंतु, त्यांनी ही बाब सर्वांपासून लपवून ठेवली. शनिवारी रात्री या मुलीची त्यांनी घरीच प्रसृती केली. त्यानंतर त्यांनी सोसायटीच्या पार्किंगच्या मागील बाजूला तोडलेल्या झाडाच्या खोडामध्ये या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला टाकून दिले. रात्रीच्या वेळी कुत्री व मांजर विचित्र का ओरड आहे, हे ऐकून सोसायटीतील काही जणांनी तिकडे जाऊन पाहिल्यावर तर एक बाळ आढळून आले. त्यांनी तातडीने उत्तमनगर पोलिसांना यांची माहिती दिली. महिला पोलीस नाईक शिला जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी या बाळाला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. वेळीच लक्षात आल्याने बाळाचे प्राण वाचविण्यात यश आले.

इकडे या मुलीच्या प्रसृतीनंतर रक्तस्त्राव खूप होऊ लागल्याने तिच्या आईने मुलीला लवळे हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे तिच्यावर उपचार करुन तिचा जीव वाचविण्यात आला. हॉस्पिटलकडून ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पौड पोलिसांनी ही माहिती उत्तमनगर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब घेतल्यावर हा सर्व प्रकार समोर आला. पोलिसांनी या मुलीसह तिची आईवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला गर्भवती केल्याप्रकरणी एका तरुणावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिलाSocialसामाजिकArrestअटक