संजय राऊतांना बहुतेक ‘अल्झायमर’ झालाय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:15 IST2021-09-07T04:15:57+5:302021-09-07T04:15:57+5:30

पुणे : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी पाठीमागून वार करण्याची आमची परंपरा नाही. आम्ही समोरून कोथळा बाहेर ...

Most of Sanjay Raut has Alzheimer's! | संजय राऊतांना बहुतेक ‘अल्झायमर’ झालाय !

संजय राऊतांना बहुतेक ‘अल्झायमर’ झालाय !

पुणे : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी पाठीमागून वार करण्याची आमची परंपरा नाही. आम्ही समोरून कोथळा बाहेर काढतो, असं वक्तव्य केलं होतं. त्याच वक्तव्यावरून भाजप आणि शिवसेना आमनेसामने आले आहे. दोन्ही बाजूने शाब्दिक चकमकी घडत असल्याचे दिसत आहे. आता या वादात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उडी घेतली त्यांनी थेट संजय राऊत यांना बहुतेक ‘अल्झायमर’ झाल्याचं दिसतंय अशी खरमरीत टीका केली आहे.

बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर, पुण्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पाटील यांनी संजय राऊत यांच्या टीकेचा समाचार घेतानाच खोटं बोल पण रेटून बोल, असं म्हणत सकाळी एक बोलायचं दुपारी एक. सायंकाळी त्यांना हेच लक्षात राहत नाही की दुपारी आपण काय बोललो. त्यांना बहुतेक अल्झायमर सुरू झाल्याचं दिसतंय अशा शब्दांत टोला लगावला.

आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही तर कोथळाच काढतो, असे राऊत क्लिअर कट म्हणाले आहे. पण पोलीस त्यांच्या दबावाखाली काम करत असल्यामुळे ते काय करतील माहिती नाही. पण आमच्या पुण्याच्या अध्यक्षांनी तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है, नेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांवर झडत आहेत. असा इशारा शिवसेनेला दिला आहे.

'बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है'बाबत विचारलं असता, पाटील म्हणाले, 'बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे, हे तर नक्कीच आहे. हैदराबादच्या वेळेलाही आम्ही एक-दोन नगरसेवकावरून थेट ५१ वर गेलो. त्याच पद्धतीने आम्ही मुंबई लढणार असं आव्हान पाटील यांनी शिवसेनेला दिलं आहे.

Web Title: Most of Sanjay Raut has Alzheimer's!