... तर पीएमपीच्या बहुतेक बस ठरतील ‘अनफिट’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 07:13 PM2019-01-19T19:13:59+5:302019-01-19T19:15:45+5:30

काही तांत्रिक त्रुटी आढळल्याने प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी नुकतेच पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या एका बसचे योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) रद्द केले.

Most of the PMP buses will be 'unfited' | ... तर पीएमपीच्या बहुतेक बस ठरतील ‘अनफिट’

... तर पीएमपीच्या बहुतेक बस ठरतील ‘अनफिट’

googlenewsNext

पुणे : काही तांत्रिक त्रुटी आढळल्याने प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी नुकतेच पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या एका बसचे योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) रद्द केले. ही तपासणी एका प्रवाशाच्या तक्रारीवरून करण्यात आली. यापार्श्वभुमीवर प्रवाशांकडून सर्वच बसची तपासणी करण्याची मागणी केली जात आहे. पण अधिकाऱ्यांनी  मार्गावरील सर्वच बसची तपासणी करण्याचे धाडस दाखविले तर बहुतेक बस ‘अनफिट’ ठरतील. ‘पीएमपी’चे दैनंदिन संचलन कोलमडून जाईल, अशी स्थिती आहे. 

              पीएमपीच्या ताफ्यात सध्या सुमारे दोन हजार बस आहेत. त्यापैकी सुमारे १४०० बस पीएमपीच्या मालकीच्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात मार्गावरील बसची संख्या ११०० च्या जवळपास आहे. तर भाडेतत्वारील ६५३ बसपैकी जवळपास ४५० बस मार्गावर असतात. त्यातही मार्गावर आलेल्या बसपैकी १५० बसचे ब्रेकडाऊन होते. तसेच उर्वरीत बसची स्थितीही तुलनेने चांगली नाही. वर्षभरापुर्वी ताफ्यात आलेल्या मिडी बसमध्येही अनेक तांत्रिक त्रुटी आढळून येतात. तर जुन्या बसला आग लागण्याच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. खिळखिळ््या बसबाबत प्रवाशांकडून तक्रारींचा दररोज पाऊस पडतो. त्यावर तक्रारीची दखल घेतल्याचा संदेशही मोबाईलवर येतो. पण प्रत्यक्षात बसची दुरूस्ती होत नसल्याचा अनुभव प्रवासी सांगतात.

            एका प्रवाशाने एका बसबाबत आरटीओकडून तक्रार केली होती. पुणे स्टेशन आगारतील या बसची तपासणी आरटीओ अधिकाऱ्यांनी केली. वायपर, इंडिकेटर नसणे तसेच इतर तांत्रिक त्रुटी आढळून आल्याने अधिकाºयांनी योग्यता प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई केली. हे प्रमाणपत्र बसची संपुर्ण तपासणी करून वर्षभरासाठी दिले जाते. या बसच्या प्रमाणपत्राची मुदत जुलै महिन्यापर्यंत होती. सहा महिन्यातच ही बस ‘अनफिट’ ठरली. या बसप्रमाणेच पीएमपीच्या बहुतेक बसची हिच अवस्था आहे. पुणे विभागाचे आरटीओ बाबासाहेब आजरी हे पीएमपीचे संचालक आहेत. त्यामुळे त्यांना बसच्या स्थितीची पुरेपुर कल्पना असेल. पण त्यानंतरही ‘आरटीओ’कडून दररोज सुमारे दहा लाख प्रवाशांची ने-आण करणाऱ्या बसच्या ‘फिटनेस’कडून दुर्लक्ष केले जात आहे. बसची तपासणी करायची झाल्यास बहुतेक बस मार्गावर येणारच नाहीत, असे पीएमपीसह आरटीओतील अधिकारीही सांगतात. 

सहा महिन्याला योग्यता प्रमाणपत्र द्या : पीएमपी प्रवासी मंच

आरटीओकडून सध्या बसची तपासणी केल्यास एकही बस मार्गावर येण्यासाठी ‘फिट’ ठरणार नाही. आरटीओला सातत्याने तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. सर्व जुन्या बसची दर सहा महिन्याला तपासणी करून प्रमाणपत्र द्यायला हवे.

Web Title: Most of the PMP buses will be 'unfited'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.