शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांपूर्वी ११ ठिकाणी उभारलेल्या ई-टाॅयलेट्सपैकी बहुसंख्य टाॅयलेट्स बंदच

By राजू हिंगे | Updated: April 15, 2025 19:52 IST

शहरातील विविध अकरा ठिकाणी अत्याधुनिक ई-टाॅयलेट्स बांधण्यासाठी २०१८ मध्ये करण्यात आली होती

पुणे :पुणे शहराचे तत्कालीन खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीतून दोन कोटी रुपये खर्चून पाच वर्षांपूर्वी ११ ठिकाणी उभारलेल्या ई-टाॅयलेट्सपैकी बहुसंख्य टाॅयलेट्स बंदच आहेत. त्यामुळे या ई-टाॅयलेट्स साध्या टाॅयलेट्समध्ये रूपांतरित करून नागरिकांना साधी, पण स्वच्छ सार्वजनिक टाॅयलेट्सची सेवा उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पालिका आयुक्ताकडे केली आहे.शहरातील विविध अकरा ठिकाणी अत्याधुनिक ई-टाॅयलेट्स बांधण्यासाठी २०१८ मध्ये करण्यात आली होती. महापालिकेने यासाठी इराम सायंटिफिक सोल्युशन्स या कंपनीला ११ ठिकाणी ही ई-टाॅयलेट्स बांधण्यासाठी व पुढे एक वर्ष मेंटेनन्स करण्यासाठी २ कोटी रुपयांची ऑर्डर दिली. ही टेक्नॉलॉजी या कंपनीने स्वतः विकसित केली असल्याने अन्य कोणी ती देऊ शकत नसल्याने टेंडर न काढता या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले. कंत्राटाप्रमाणे कंपनीनेही ई-टाॅयलेट्स बसवून एक वर्ष मेंटेन (२०१९ अखेरपर्यंत) केली. मात्र, त्यानंतर या कंपनीने महापालिकेला टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर केली नाही व पुढे मेंटेनन्स कंत्राट घेण्यातही रस दाखवला नाही आणि ही सर्व ई-टाॅयलेट्स बंद पडली.

रूपाली हाॅटेलसमोर, रामोशी वस्ती, हिरवाई गार्डन, संभाजी उद्यान, माॅडेल काॅलनी, ओम सुपर मार्केट, टिगरे गार्डन, विमाननगर, निलायम पूल, सिंहगड रोड एसटीपी, वाडिया महाविद्यालयाजवळ, तुकाई टेकडी, एल. एम. डी. गार्डन, बावधन शेवटी महापालिकेने नवीन टेंडर काढून दिली होती. सुमारे पाच लाख रुपये खर्ची पडूनही या ११ पैकी तीन टाॅयलेट्स चालू स्थितीत आहेत. त्यामुळे शहरात साध्या, पण स्वच्छ सार्वजनिक टाॅयलेट्सची प्रचंड कमतरता असताना ती मोठ्या प्रमाणावर बांधायची सोडून असली अत्याधुनिक ई-टाॅयलेट्स बांधण्यावर प्रचंड पैसा खर्च करण्याची कल्पना येते कुठून, असा सवाल सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिकाcivic issueनागरी समस्या