शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांनी जाणून घेतले मशिदीचे अंतरंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 20:17 IST

इस्लामिक रिसर्च सेंटरच्या वतीने विजीट अवर माॅस्क हा दाेन दिवसीय कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात नागरिकांना मशिद पाहण्यासाठी खुली करण्यात आली हाेती.

पुणे :  मशिदीत फक्त मुस्लिमांनाचा प्रवेश दिला जाताे. तिथे काहीतरी गुढ असणार, अल्लाहचा फाेटाे किंवा मुर्तीसमाेर नमाज पढला जात असेल अशा सर्व समजुतींचं निराकरण पुण्यातील इस्लामिक रिसर्च सेंटरकडून करण्यात आले. या संस्थेतर्फे विजीट अवर माॅस्क हा दाेन दिवसीय आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात सर्व वयाेगटातील पुरुष आणि महिलांना मशिदीची संपूर्ण माहिती थेट मशिदीत जाऊन देण्यात आली. जवळपास तिनशेहून अधिक नागरिकांनी मशिदीला भेट देऊन इस्लाम घर्म समजावून घेतला. हा उपक्रम सामाजिक सलाेख्यासाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.     पुण्यातील कॅम्प भागातील आझम कॅम्पस मशिदीमध्ये या उपक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या उपक्रमात इस्लामच्या प्रारंभापासून ते आजपर्यंत चालत आलेल्या परंपरेची  माहिती लोकांना देण्यात आली. वजू म्हणजे काय? नमाज़ म्हणजे काय? अज़ान म्हणजे काय? काबा कश्याला म्हणतात यासारख्या इस्लाम मधील प्रचलित बाबी लोकांना समजावून सांगत त्यांच्या विविध प्रश्नांचे निरसन करण्यात आले. विशेष म्हणजे महिलांनाही मशिदीत खुला प्रवेश देण्यात आला. अनेकांनी कुराणबद्दल माहिती आवर्जुन जाणून घेतली. या उपक्रमात विविध जाती धर्माचे लाेक सहभागी झाले हाेते.  मुस्लिम धर्मीय प्रार्थनास्थळाविषयी असणारे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. या मशिदीला भेट देणारी अंकिता आपटे म्हणाली, या उपक्रमामुळे इस्लाम घर्माबाबत असलेले गैरसमज आणि चुकीच्या संकल्पना दूर हाेण्यास मदत झाली. यातून नवीन माहिती मिळाली.  

    या उपक्रमाबाबत बाेलताना इस्लामिक रिसर्च सेंटरचे अध्यक्ष करीमुद्दीन शेख म्हणाले, लाेकांनी मशिद आतून कशी असते हे कधी पाहिले नव्हते. मशिदीमध्ये नेमके काय असते याबाबत नागरिकांमध्ये कुतुहूल हाेते. त्याचबराेबर अनेकांच्या मनात मशिदीबद्दल अनेक गैरसमज देखिल आहेत. हे गैरसमज दूर करण्यासाठी या उपक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग घेत मशिदीबाबतची सर्व माहिती जाणून घेतली. तसेच मशिदीबाबदच्या त्यांच्या सर्व शंकांचे निरसण यावेळी करण्यात आले. पुण्यात हा उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात आला हाेता. यापुढेही असा उपक्रम राबविण्याचा आमचा विचार आहे.  

टॅग्स :Islamइस्लामMosqueमशिदStudentविद्यार्थीPuneपुणे