मोशी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

By Admin | Updated: September 16, 2014 00:22 IST2014-09-16T00:22:08+5:302014-09-16T00:22:08+5:30

पुणो महापालिका हद्दीतील कचरा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मोशी परिसरात जिरवण्याच्या प्रकल्पाला मोशी ग्रामस्थांकडून तीव्र विरोध केला जात आहे.

Moshi Vigilance Movement Warning | मोशी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

मोशी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

मोशी : पुणो महापालिका हद्दीतील कचरा  पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मोशी परिसरात जिरवण्याच्या प्रकल्पाला मोशी ग्रामस्थांकडून तीव्र विरोध केला जात आहे.  येथील श्री नागेश्वरमहाराज मंदिरातील ग्रामस्थांच्या सभेत कचरा प्रकल्पाला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. 
मोशी परिसरातील गंधर्वनगरीजवळ असलेल्या पहिल्या कचरा डेपोमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचा दररोजचा कचरा आणून टाकला जात आहे. त्यामुळेच रहिवासी हैराण असताना पुन्हा नव्याने या ठिकाणी कचरा डेपो कशासाठी, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. सकाळी मंदिरामध्ये सभेला सुरुवात झाली. पुण्यातील कचरा त्यांच्या हद्दीत कोठेही टाकण्यात यावा. त्याचा नाहक त्रस मोशीकरांना नको, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. 
मोशीतील खाण परिसरातील या प्रस्तावित प्रकल्पामुळे मोशीतील डुडुळगाव, च:होली, कानिफनाथ गिलबिलेनगर परिसरातील रहिवाशांना याचा सामना करावा लागणार आहे. लोणी काळभोर, फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर कचरा डेपो मोशीत हलवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे सामान्यांमधून संतापाची लाट उसळली आहे. 
कोणत्याही परिस्थितीमध्ये पुण्याचा कचरा मोशीमध्ये जिरवला जाऊ देणार नाही, या भूमिकेवर ग्रामस्थ व रहिवासी ठाम असून, वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. 
स्थानिक नगरसेवक धनंजय आल्हाट, माजी नगरसेवक बबन बोराटे, गेनभाऊ आल्हाट, हनुमंत बो:हाडे, दत्तात्रय मोकाशी, दत्तू कुदळे, नारायण आल्हाट, राम सावंत, गोविंद सस्ते यांसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. संबंधित कचरा डेपो प्रकल्पाला ग्रामस्थांकडून तीव्र विरोध होत आहे.  आंदोलनाचा इशारा 
संघर्ष समिती व ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.(प्रतिनिधी)
 

 

Web Title: Moshi Vigilance Movement Warning