शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अ‘जून’ भरपूर... पुढील जून महिन्यातही देशात सरासरीपेक्षा अधिक कोसळधारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 07:11 IST

शेतकऱ्यांना मिळणार दिलासा, राज्यात पावसाचे आणखी १० बळी

नवी दिल्ली/पुणे : मे महिन्यात सलामीलाच दाणादाण उडवून देणाऱ्या पावसाची धुवांधार बॅटिंग जून महिन्यातदेखील तशीच सुरू राहणार आहे. जूनमध्ये देशातील बहुतेक भागात सरासरी ते सरासरीपेक्षा जास्तच पाऊस पडण्याची शक्यता आहे. जूनमध्येच शेतकरी खरीप पिकांची पेरणी सुरू करतात. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे हवामान विभागाने मंगळवारी सांगितले. येत्या तीन ते चार दिवसांत राज्यातील ८० टक्के भाग मान्सूनने व्यापला जाईल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्यपी यांनी पुण्यात दिली. दरम्यान, राज्यात पावसाचा जोर कायमच असून मंगळवारी राज्यातील विविध भागांत पावसाशी संबंधित घटनांत १० जण ठार झाले.

मंगळवारी मान्सूनच्या प्रवासात प्रगती झाली नाही. मात्र, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे तसेच मध्य प्रदेशातील प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. पूर्वमोसमी पावसाने ओढ दिलेल्या उत्तर महाराष्ट्रातही पुढील तीन ते चार दिवसांत चांगला पाऊस होण्याची शक्यता वाढली आहे. जूनमध्ये १०८ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडेल. दक्षिणेकडील भागांत व वायव्य आणि ईशान्य भारतात कमी पाऊस पडू शकतो, असा अंदाज आहे.

तीन दिवसांत ८०% राज्य व्यापणार

सध्या अरबी समुद्रात तयार झालेली प्रणाली तसेच उत्तर कोकणावर तयार झालेल्या चक्रवाताच्या स्थितीमुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दक्षिण छत्तीसगडवरही एक प्रणाली स्थित असून ७० अंश उत्तरेला एक कमी दाबाची द्रोणिका रेषा तयार झाली आहे. ही रेषा आणखी उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात ओडिशा किनारपट्टी भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, मध्य प्रदेशातील मध्य भागात आणखी एक प्रणाली तयार झाली आहे. त्यामुळे ४८ तासांमध्ये पावसाचा जोर वाढेल. या तीव्र प्रवाहांमुळे तीन ते चार दिवसांत राज्यात ८० टक्के क्षेत्रावर मान्सूनचे आगमन झालेले असेल, असे डॉ. काश्यपी म्हणाले.

तत्काळ भरपाई द्या : मुख्यमंत्री

मुंबई : अतिवृष्टीमुळे परिस्थितीचा मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला. शेती, घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.    

कुठे काय घडले?

नांदेड : हदगाव तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, पुरात मायलेकी वाहून गेल्या

वर्धा : कासारखेडा (ता.आर्वी) येथे शेतात वीज कोसळून एक ठार, दुसरा गंभीर जखमी

अहिल्यानगर : घराचा स्लॅब कोसळून तरुणीचा, कर्जत तालुक्यात भिंत कोसळून महिलेचा मृत्यू

गोंदिया : कालीमाती (ता. आमगाव) येथे शेतात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

भंडारा : पिंपळगाव (ता. पवनी) येथे शेतात वीज पडून दोघांचा मृत्यू, दोघे जखमी

चंद्रपूर : वीज पडून कामगार ठार, तीन जण जखमी

धाराशिव : जिल्ह्यात ४२ पैकी तब्बल १९ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नाेंद झाली.

अहिल्यानगर : शहर जलमय, जिल्ह्यात दोन महिलांचा मृत्यू, पुराच्या पाण्यातून आठ जणांची सुटका

कोल्हापूर : धरणक्षेत्रात धुवाधार, राधानगरी ४७ टक्के तर तुळशी धरण ५२ टक्के भरले 

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र