शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधनमुळे एसटीला तुडूंब गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 18:38 IST

रक्षाबंधनानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असून एसटी प्रशासनामार्फत काही मार्गांवर जादा एसटी बसेस साेडण्यात येणार अाहेत.

पुणे : रक्षाबंधन सणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची एसटीला तुडूंब गर्दी होत आहे. सलग दोन दिवस सुट्ट्यांमुळे यंदा तुलनेने गर्दी अधिक असून एसटी प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे. शनिवारी प्रवाशांच्या गर्दीनुसार विविध मार्गांवर बस सोडण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

    रक्षाबंधननिमित्त शहरातून बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. या सणासाठी एसटी महांडळाकडून पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, कोकणात ठिकठिकाणी जाण्यासाठी जादा बसेस सोडल्या जातात. यंदा रक्षाबंधन हा सण रविवारी आला आहे. तर आदल्या दिवशीही चौथ्या शनिवारमुळे शासकीय सुट्टी, तसेच अनेक शाळांनाही सुट्टी असल्याने बाहेर गावी जाणाऱ्यांच्या संख्येत यंदा मोठी वाढ झाली आहे. त्यासाठी शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन या बसस्थानकांवर शुक्रवारपासूनच गर्दी झाली आहे. शनिवारी या गर्दीमध्ये आणखी भर पडली असून रविवारी त्यात पुन्हा वाढ होईल. नियमित प्रवाशांच्या तुलनेत बसस्थानकांवर शनिवारी जवळपास दुप्पट गर्दी होती. त्यानुसार नियोजन करण्यात आल्याची माहिती एसटीच्या अधिकाºयांनी सांगितले. स्वारगेट बसस्थानकातून दादर, बोरीवली, ठाणे, सांगली, बारामती, कोल्हापूर, सोलापूर या मार्गांवरील बसेसला मोठी गर्दी आहे. नियमित बसेसच्या व्यतिरिक्त प्रवाशांच्या गर्दीनुसार जादा गाड्या सोडल्या जात आहेत.

     गर्दी जास्त असल्याने पुणे विभागातील अन्य आगारांच्या सुमारे ३० गाड्या तर पुणे विभागाव्यतिरिक्त इतर विभागाच्या सुमारे १००-१२५ गाड्या स्वारगेट आगाराला देण्यात आल्या आहेत. या सर्व गाड्या भरून जात आहेत. शिवाजीनगर बसस्थानकातून औरंगाबाद, नाशिक, दादर या मार्गावर जाणाºया गाड्यांना प्रवाशांची गर्दी होत आहे. नियमित बसेसच्या तुलनेत १० ते १५ गाड्या जादा सोडण्यात येत आहेत. इतर आगारांकडून १२ जादा गाड्या मागविण्यात आल्या आहेत. यावर्षी सलग दोन दिवस सुट्ट्या आल्यामुळे प्रवाशांर्ची गर्दी वाढली आहे. शुक्रवारपासूनच गर्दी होत असून ही गर्दी सोमवार दुपारपर्यंत कायम राहील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेstate transportराज्य परीवहन महामंडळRaksha Bandhanरक्षाबंधनnewsबातम्या