शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

‘वनचारी’ ने बनवले शंभरहून अधिक ‘आॅक्सिजन व्हेंटिलेटर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 10:33 IST

उजाड रानावर सहा वर्षात बहरतेय वनराई

ठळक मुद्देम्हातोबा टेकडीलगत उपक्रम शंभरहून अधिक देशी वृक्ष येथे बहरत असून, ते शुध्द आॅक्सिजनचे ‘व्हेंटीलेटर’च

पुणे : कोरोनाच्या महामारीमुळे आॅक्सिजनच्या ‘व्हेंटीलेटर’च्या अभावी अनेक रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आॅक्सिजन व्हेंटीलेटरला मागणी वाढली आहे. पण नैसर्गिक आॅक्सिजनचे ‘व्हेंटीलेटर’ तयार करून त्याचा शेकडो नागरिक लाभ घेत आहेत. म्हातोबा टेकडीलगतच हा ‘आॅक्सिजन पार्क’ तयार करण्यात आला आहे. एका व्यक्तीपासून झाडे लावण्याच्या उपक्रमाला सुरवात झाली आणि आज अनेकजण एकत्र आले आहेत. शंभरहून अधिक देशी वृक्ष येथे बहरत असून, ते शुध्द आॅक्सिजनचे ‘व्हेंटीलेटर’च आहेत. 

म्हातोबा टेकडीच्या लगत राहुल टॉवर्स ही मोठी सोसायटी आहे. त्या ठिकाणी निसर्गप्रेमी मकरंद शेटे राहतात. त्यांनी हा उपक्रम राबविला आहे. या विषयी शेटे म्हणाले,‘‘ मी ‘वनचारी’ असा एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवला आहे. आम्ही सर्व जण अनेक वर्ष या टेकडीवर काम करत आहोत. पाच-सहा वर्षांपूर्वी रोपं लावायला सुरवात केली. देशी वृक्षांवर भर देऊन घरून पाणी आणून या रोपांना जगवले आहे. सुरवातीला काही लोकांनी तर काही प्राण्यांनी रोपांचे खूप नुकसान केले. पण आम्ही हरलो नाही. परत रोपं लावली आणि ती जगवली. आता या झाडांवर धनेश, पोपट, रॉबिन असे अनेक पक्षी येत आहेत.

या कामासाठी तुषार कासार, सुधीर संचेती,अमोल टोपे, संदीप काळे, शिव, गुंजन, विठ्ठल ऐनापुरे, उदय टोळ, विनोद कुलकर्णी, हेमंत वाघ, मंदार गरुड, महेश गोखले, मनीषा गरुड, डॉ. मेदिनी डिंगारे, डॉ. अतुल कुलकर्णी, अ‍ॅड. विंदा महाजन, आनंद मोकाटे यांची मदत मिळत असून, नगरसेवक किरण दगडे पाटील यांचीही नेहमी साह्य होते.’’ ====================आमची राहुल टॉवर्स नावाची मोठी सोसायटी आहे. त्याच्या शेजारीच ही जागा आहे. वन विभागाने त्यांची सीमाभिंत उभी केली आणि त्याच्या बाजूला मोकळी जागा होती. त्यावर वृक्षारोपण करण्याचे ठरवले. पाच वर्षांपूर्वी झाडं लावण्यास सुरवात केली. आज त्या ठिकाणी शंभरहून अधिक देशी वृक्ष बहरत आहेत. काही वर्षांनी येथे घनदाट जंगलच तयार होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. -  मकरंद शेटे, निसर्गप्रेमी ===========================देशी झाडांना बहर वड, पिंपळ, चिंच, जांभूळ,आपटा, बिजा, उंबर, गोरखचिंच, बेल, वावळ, शिवण, शिसव, करंज, कांचन , मोह, खुडा, हळदू, सीताफळ, पेरू, बहावा, काटेसावर, मुचकुंद, पांगारा, आवळा, रिठा, कडुनिंब, बकानीम, कदंब, आंबा, चिंच, रबर आदी शंभरहून अधिक झाडे आज बहरत आहेत. =======================

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरणHealth Tipsहेल्थ टिप्स