निम्म्याहून अधिक आरोग्य सेवकांनी घेतली नाही लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:12 AM2021-02-24T04:12:28+5:302021-02-24T04:12:28+5:30

पुणे : शहरात साधरणत: ५५ हजाराहून अधिक आरोग्य सेवकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नाव नोंदणी केली असली तरी, अद्यापही निम्म्याही ...

More than half of health workers have not been vaccinated | निम्म्याहून अधिक आरोग्य सेवकांनी घेतली नाही लस

निम्म्याहून अधिक आरोग्य सेवकांनी घेतली नाही लस

Next

पुणे : शहरात साधरणत: ५५ हजाराहून अधिक आरोग्य सेवकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नाव नोंदणी केली असली तरी, अद्यापही निम्म्याही सेवकांनी या लसीचा पहिला डोसही घेतलेला नाही़ दरम्यान २४ फेब्रुवारीपर्यंत आरोग्य सेवकांच्या लसीकरणाचा पहिला टप्पा पुर्ण करण्याबाबतच्या केंद्राच्या सूचना असल्या तरी, ‘कोविन अ‍ॅप’ मधील तांत्रिक अडचणींमुळे अनेकांना इच्छा असूनही लस घेता येत नसल्याचे वारंवार दिसून येत आहे़

पुणे महापालिकेकडील आकडेवारीनुसार १६ जानेवारी पासून २३ फेब्रुवारीपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नावनोंदणी केलेल्या आरोग्य सेवकांपैकी ३२ हजार ३२८ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे़ यामुळे उर्वरित आरोग्य सेवकांना लस घेण्यासाठी आता किती वाढीव मुदत मिळणार याची वाट महापालिका पाहत आहे़ तर शुक्रवार दिनांक २६ फेब्रुवारीपर्यंत आरोग्य सेवकांना लसीचा पहिला डोस उपलब्ध असल्याची माहितीही आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे़

लसीकरणाच्या दुसरा डोस देण्याची प्रक्रिया शहरात सुरू झाली असून, १५ फेब्रुवारीपासून आत्तापर्यंत १ हजार ७४८ जणांनी २८ दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्यावर लसीचा दुसरा डोस घेतला आहे़

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्क्सस यांना ८ फेब्रुवारीपासून लसीकरणाची सुरूवात करण्यात आली आहे़ याकरिता साधारणत: ६२ हजार जणांनी नोंदणी केली असली तरी, पहिल्या चौदा दिवसात केवळ ७ हजार १७४ जणांनी लस घेतली आहे़

---------------

Web Title: More than half of health workers have not been vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.