शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बेकायदा बांधकामांची बजबजपुरी, कोर्टाच्या स्टेचा आधार घेत नियमापेक्षा जास्त बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 02:48 IST

अप्पर व्हीआयटी चौक ते आईमाता मंदिर पुणे स्टेशनपासून कात्रज-कोंढवा रत्याला जोडणार हा ८० फुटी समांतर रस्ता आहे.

कात्रज  - अप्पर व्हीआयटी चौक ते आईमाता मंदिर पुणे स्टेशनपासून कात्रज-कोंढवा रत्याला जोडणार हा ८० फुटी समांतर रस्ता आहे. आईमाता मंदिरापासून व्हीआयटी चौकापर्यंत हा रस्ता अतिक्रमणामुळे फक्त २० फूट शिल्लक राहिला आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने उभारण्यात आलेले मंगल कार्यालयाचे पार्किंग व गोडाऊन यामुळे या रस्त्याला वाहतूककोंडीचे ग्रहण लागले आहे. अनेक निष्पापांचे बळीदेखील या रस्त्याने घेतलेले आहेत.महापालिकेचा बांधकाम विभाग व अतिक्रमण विभाग यांच्यातील एकाही अधिकाऱ्यामध्ये हे धाडस नाही, की ते या प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणे काढून टाकतील व आपले कर्त्यव्य प्रमाणिकपणे बजावतील. या प्रत्येक अतिक्रमणात राजकीय नेते व अधिकारी यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. म्हणूनच रस्त्यावरील एकाही मंगल कार्यालय किंवा गोडाऊनवर कारवाई करून रस्ता मोकाळा करून दाखविण्याचे धाडस पालिकेचे अधिकारी दाखवत नाहीत, हे या भागातील वास्तव आहे.अनेक गोडाऊनवाले स्वत:हून आपली रोडमध्ये जाणारी जागा ताब्यात देण्यास तयार आहेत. मात्र, पालिका अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे या भागातील नागरिकांना त्रास होत आहे. हा भाग हिलटॉप-हिलस्लोप आहे; त्यामुळे कुठल्याही बांधकामाला येथे परवानगीनाही.परंतु, राजरोसपणे या भागात गोडाऊनची कामे सुरू आहेत. आतील गोडाऊनवर कारवाईचा बडगा पालिका नेहमी उगारतअसते; मात्र रोडवरच्या गोडाऊनला अभय का? असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.मुख्य रस्त्यावर अनधिकृत बांधकामे, गोडाऊन यांना वरदहस्तकोर्टातील स्टेवर आयुक्तांनी लक्ष द्यावे. या भागातील अनेक गोडाऊनवाल्यांनी कोर्टात जाऊन अतिक्रमण पाडू नये, यासाठी स्टेचा आधार घेतलेला आहे. कोर्टाचा स्टे असल्यामुळे अतिक्रमण विभागाला कारवाई करता येत नाही. मात्र, हा गोडाऊन उभारलेला भाग हिलटॉप-हिलस्लोप आहे. या कायद्याप्रमाणे या भागात फक्त १ हजार फुटांच्या भूखंडावर फक्त ४० फूट बांधकाम करता येते, तेही प्लॅन पास केल्यावर. यामुळे पहिल्याच तारखेला रस्त्यावरील अनधिकृत गोडाऊन बांधकामांचा स्टे उठणे अपेक्षित आहे.मात्र, तसे होत नाही. तारीख पे तारीख पुढे चालू आहे. स्टेच्या विरोधात पालिकेने पूर्ण ताकदीने आता कोर्टासमोर बाजू मांडणे आवश्यक आहे. तरच, या भागातील नागरिकांना न्याय मिळेल. तसेच, ज्यांनी मुख्य रस्त्यावर अनधिकृत बांधकामे, गोडाऊन केली आहेत, त्यांच्याकडून कारवाईचा खर्च व दंड वसूल करणेदेखील अपेक्षित आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही.हे अंतर अंदाजे दीड कि.मी.; मात्र सकाळी किंवा संध्याकाळी हे अंतर जर तुम्हाला पार करायचे असेल, तर त्यासाठी लागतो दीड तास... होय हे सत्य आहे. या भागातील राजकीय नेत्यांच्या निष्क्रियतेमुळे व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक वर्षांपासून या भागातील या रस्त्यावरून प्रवास करणारे हजारो नागरिक हा त्रास सहन करीत आहेत.सहकारनगर वाहतूक पोलीस पावती फाडण्यासाठीचया रस्त्यावर सहकारनगर वाहतूक विभागाचे चार-पाच कर्मचारी दिवसभर उभे असतात; मात्र ते येथील वाहतूककोंडी सोडवायची सोडून वरिष्ठांकडून आलेले पावतीचे टार्गेट पूर्ण करण्यामध्ये व्यस्त दिसतात. वाहतूक विभागाने या भागातील वाहतूककोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी व पावती फाडण्यासाठी वेगळे पोलीस नेमावेत, तरच या भागातील वाहतूककोंडी सुटण्यास वाहतूक पोलिसांचा हातभार लागेल.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या