रक्षाबंधनानिमित्त पीएमपीतर्फे जादा बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 03:48 AM2017-08-05T03:48:02+5:302017-08-05T03:48:02+5:30

रक्षाबंधन सणानिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत (पीएमपी) सोमवारी (दि. ७) जादा बस सोडण्यात येणार आहेत. या काळात नियोजित बसपेक्षा ७१ बस जादा असतील, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

 More bus by PMP for Raksha Bandhan | रक्षाबंधनानिमित्त पीएमपीतर्फे जादा बस

रक्षाबंधनानिमित्त पीएमपीतर्फे जादा बस

Next

पुणे : रक्षाबंधन सणानिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत (पीएमपी) सोमवारी (दि. ७) जादा बस सोडण्यात येणार आहेत. या काळात नियोजित बसपेक्षा ७१ बस जादा असतील, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.
येत्या सोमवारी (दि. ७) रक्षाबंधनाचा सण आहे. यानिमित्त बसने प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी ‘पीएमपी’कडून दर वर्षी जादा बस सोडल्या जातात.
यंदाही प्रशासनाकडून जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी दैनंदिन संचालनात असलेल्या १,५७९ बस व्यतिरिक्त ७१ जादा बस मार्गावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
त्यासाठी वाहक, चालक, पर्यवेक्षीय सेवक यांच्या
साप्ताहिक सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, महत्त्वाच्या स्थानकांवर बस संचालन नियंत्रणासाठी अधिकाºयांच्या नेमणुका करण्यात आल्या
आहेत. तसेच, दि. ५ ते ८ आॅगस्ट असे ३ दिवस नियोजित पूर्ण
क्षमतेने बस उपलब्ध करण्याचे नियोजन असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title:  More bus by PMP for Raksha Bandhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.