शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

शहरात दीड हजारपेक्षा अधिक अनधिकृत मोबाईल टॉवर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 12:00 PM

शहरात सध्या उभे असलेले १ हजार ८९५ पैकी कवेळ २३८ मोबाईल टॉवर अधिकृत आहे...

ठळक मुद्देमोबाईल टॉवर्समुळे होता त्रास : महापालिकेकडे नागरिकांच्या तक्रारीमहापालिकेला मोबाईल टॉवरच्या माध्यमातून ७ कोटी २४ लाख रुपयांचे उत्पन्न

पुणे : गेल्या काही वर्षांत शहरात सर्वच भागात इमारतीच्या छतावर सर्रास अनधिकृतपणे मोबाईल टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. शहरात सध्या उभे असलेले १ हजार ८९५ पैकी कवेळ २३८ मोबाईल टॉवर अधिकृत आहे. तब्बल १ हजार ६५७ मोबाईल टॉवर अनधिकृत असल्याचे प्रशासनाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या संगनमतांनी अशा बेकायदेशीर टॉवरची उभारणी होत आहे. मोबाईल टॉवर्सच्या रेडियशनमुळे त्रास होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी महापालिकेकडे केल्या आहेत. शहरातील अनधिकृत मोबाईल टॉवर्स, यासाठी महापालिकेकडून आकारण्यात येणारा दर, यामुळे महापालिकेला मिळणार उत्पन्न, नागरिकांच्या आलेल्या तक्रारी आणि करण्यात आलेली कारवाईबाबत नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी प्रशासनाला लेखी प्रश्न विचारले होते. या प्रश्नांना लेखी उत्तर देताना वरील माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या हद्दीत विविध मोबाईल कंपन्यांकडून सर्व भागात इमारतींच्या छतावर, जमिनीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत मोबाईल टॉवर उभारले आहेत. शहरात मोबाईल टॉवरला परवानगी देण्यासाठी स्कु्रटिनी फी म्हणून प्रत्येकी ६०० रुपये आणि एकरकमी प्रशासकीय शुल्क रक्कम ३० हजार रुपये, इमारतीवरली मोबाईल टॉवर बांधकामासाठी शिघ्रसिध्दागणक दराच्या ४० टक्क्या पैकी ८ टक्क्या नुसार दर घेतले जातात. तर मोकळ्या जागेवर मोबाईल टॉवर असल्यास ८ टक्क्या पैकी जागेच्या शिघ्रसिध्दगणक दरानुसार मोबाईल टॉवरला परवानगी देण्यासाठी दर आकारले जातात. मोबाईल टॉवरच्या माध्यमातून महापालिकेला ७ कोटी २४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मोबाईल टॉवरच्या मिळकत करातून एप्रिल ते ३ डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत ३१ कोटी ३६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. शहरात सर्रास उभारण्यात आलेल्या अनधिकृत मोबाईल टॉवरच्या रेडिअशनमुळे इमारती लगतच्या नागरिकांना त्रास होत आहे. याबाबत महापालिकेकडे नागरिकांनी लेखी तक्रारी देखील केल्या आहेत. ज्या भागातून नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या त्या मोबाईल टॉवरवर कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे.  

टॅग्स :MobileमोबाइलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका