शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

MHADA: म्हाडाच्या साडे चार हजार घरांसाठी दहा दिवसांत बारा हजारपेक्षा अधिक अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 12:13 IST

पुणे म्हाडाच्या वतीने नितीन माने-पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एक ते दीड वर्षांत तब्बल तीन सोडती काढून नवा विक्रम केला आहे...

पुणे:पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) वतीने 16 नोव्हेंबर रोजी तब्बल 4 हजार 222 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. म्हाडाच्या घरांना संपूर्ण राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून, दहा दिवसांत 12 हजार 633 अर्ज आले आहेत. यामध्ये देखील फस्ट कम फस्ट सेलचे फ्लॅट तर दोन दिवसांत विक्री झाली आहे. अद्यापही ज्या लोकांनी अर्ज केले नाही त्यांना 16 डिसेंबर अखेर पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी अर्ज करण्याचे आवाहन पुणे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने-पाटील यांनी केले आहे.

पुणे म्हाडाच्या वतीने 8 वी ऑनलाईन सोडत जाहीर केली. यात २८२३ सदनिका व २०% सर्वसमावेशक योजनअंतर्गत १३९९ सदनिका असे एकूण ४२२२ नवीन सदनिकांच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. पुणे म्हाडाच्या वतीने नितीन माने-पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एक ते दीड वर्षांत तब्बल तीन सोडती काढून नवा विक्रम केला आहे. यामुळेच केल्या वर्षभरात हजारो गरीब व सर्वसामान्य कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले.

आता नव्याने जाहीर केलेल्या 4 हजार 222 घरांसाठी नवीन वर्षांत ऑनलाईन लाॅटरी काढण्यात येईल. यासाठी आता पर्यंत १२६३३ इतके विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य अंतर्गत संकेत क्रमांक ५३२ परांजपे अभिरुची परिसर, धायरी ( १RK ) येथील ७५ सदनिका उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. त्या सदनिकांसाठी ७२८ इतके विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ४०५ अर्जदारांनी अनामत भरली आहे. या  ७५ सदनिका वितरित करून झाल्या आहेत. यावरून असे दिसून येत आहे की सोडतीसाठी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद दिसून येत आहे. तरी नागरिकांनी त्वरीत आपले रजिस्टेशन करून संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन नितीन माने-पाटील यांनी केले आहे.

अशी असेल घरांची सोडत म्हाडा गृहनिर्माण योजना : 59 सदनिका खाजगी बिल्डर 20 टक्क्यांतील घरे : 2945म्हाडा प्रथम येणाऱ्यास प्राधान्य  : 2886 

सोडतीचे वेळापत्रक ऑनलाईन अर्ज दाखल करणे :  16 नोव्हेंबर ऑनलाईन अर्ज दाखल करणे अंतिम तारीख  : 16 डिसेंबर ऑनलाईन पेमेंट स्वीकृती  :  17 डिसेंबर ऑनलाईन लाॅटरी : 7 जानेवारी 2022

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारHomeसुंदर गृहनियोजन