इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महागाई विरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:07 IST2021-07-04T04:07:41+5:302021-07-04T04:07:41+5:30

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करत, तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे पाटील व कार्याध्यक्ष अतुल झगडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार ...

Morcha against inflation on behalf of Indapur Nationalist Congress | इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महागाई विरोधात मोर्चा

इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महागाई विरोधात मोर्चा

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करत, तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे पाटील व कार्याध्यक्ष अतुल झगडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार (२ जुलै) रोजी राष्ट्रवादी तालुका संपर्क कार्यालय ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात जोरजोरात घोषणा दिल्या व निषेध व्यक्त केला.

यावेळी निषेध मोर्चात इंदापूरचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुकाध्यक्ष सागरबाबा मिसाळ, माजी उपनगराध्यक्ष दिलीप वाघमारे, श्रीधर बाब्रस, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर, तालुका उपाध्यक्ष नवनाथ आबा रुपनवर, अण्णासाहेब धोत्रे, शिवाजी तरंगे, सागर पवार, सचिन खामगळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हनुमंत कोकाटे म्हणाले की, जनतेला खोटी आश्वासने देत सात वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आज देशाच्या अर्थव्यवस्थेची पूर्णपणे वाट लावली असून पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढवून सर्वसामान्य जनतेचे जीवन मुश्कील केले आहे, जनतेप्रती असंवेदनशील असणाऱ्या अशा लबाड व मग्रूर केंद्र सरकारचा आम्ही जाहीर धिक्कार करत आहोत, अशा शब्दात केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.

०३ इंदापूर एनसीपी

केंद्र सरकारच्या महागाई विरोधात आंदोलन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते

Web Title: Morcha against inflation on behalf of Indapur Nationalist Congress