मोरया! अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने 'दगडूशेठ'ला आकर्षक सजावट; 'श्रीं'च्या दर्शनाची ऑनलाईन सोय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 11:56 AM2021-03-02T11:56:55+5:302021-03-02T11:58:01+5:30

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी

Moraya! Angarki Chaturthi closed for 'Dagdusheth' Ganpati temple darshan; Online darshan facility for devotees | मोरया! अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने 'दगडूशेठ'ला आकर्षक सजावट; 'श्रीं'च्या दर्शनाची ऑनलाईन सोय

मोरया! अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने 'दगडूशेठ'ला आकर्षक सजावट; 'श्रीं'च्या दर्शनाची ऑनलाईन सोय

Next

पुणे : अंगारकी चतुर्थीच्या दिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे ३ ते ४ लाख भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आज मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला. त्यामुळे भाविकांना चतुर्थीच्या दिवशी मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे जाहीर करण्यात आले आहे. पण अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने श्रींची विधिवत अभिषेक, पूजा यांसारखे सर्व धार्मिक विधी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. 
 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीचे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मंदिरात खबरदारी म्हणून सर्व सुविधा ; हार, नारळ स्विकारणे बंद
पुण्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये भाविकांकडून प्रसाद, फुले, हार स्विकारणे बंद केले आहे. तसेच येणा-या भाविकांची तापमान तपासणी, सॅनिटाझेशन, मास्क ही नियमावली पाळून मंदिरात प्रवेश दिला जात आहे. मंदिरात कोणालाही बसण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. राज्य सरकारने जी नियमावली आखून दिली आहे. त्याचे काटेकोरपणे पालन मंदिरात केले जात आहे.

Web Title: Moraya! Angarki Chaturthi closed for 'Dagdusheth' Ganpati temple darshan; Online darshan facility for devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.