पावसाळ्याआधी हवे गाळ काढण्याचे नियोजन

By Admin | Updated: May 10, 2017 03:47 IST2017-05-10T03:47:48+5:302017-05-10T03:47:48+5:30

वीर धरण पुण्यासह सातारा व सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरले आहे. गेल्या वर्षी धरण १०० टक्के भरले होते. धरणातील गाळ

Before the monsoon, the mud removal plans | पावसाळ्याआधी हवे गाळ काढण्याचे नियोजन

पावसाळ्याआधी हवे गाळ काढण्याचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
गराडे : वीर धरण पुण्यासह सातारा व सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरले आहे. गेल्या वर्षी धरण १०० टक्के भरले होते. धरणातील गाळ काढण्यामार्फत शासनातर्फे गाळ काढण्याचा आदेश नव्हता. पुणे व सातारा या सीमेवर असणाऱ्या वीर धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या सोयीप्रमाणे धरणातील गाळ काढून नेला होता. परंतु त्याचे प्रमाण अत्यल्प होते. यावर्षी शासनाने धराणातील गाळ काढण्यासंबधी सविस्तर, स्पष्ट आदेश काढला आहे, त्याची अंमलाबजावणी करण्याच्या सूचना धरण व्यवस्थापनाला प्राप्त झाल्या आहेत. धरणातील गाळ काढल्यास पाणीसाठा वाढून त्याचा फायदा सर्वांना होईल, मात्र यासाठी पाऊस सुरु होण्याआधीच धरणातील गाळ काढण्याचे नियोजन करण्याची गरज असल्याचे वीर धरणाचे उपअभियंता जमदाडे यांनी सांगितले. गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी आपापल्या सोईप्रमाणे वीर धरणातील गाळ काढून नेला होता. परंतु, त्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे धरण १०० टक्के भरूनसुद्धा म्हणावा तितका पाणीसाठा वाढत नव्हता.

Web Title: Before the monsoon, the mud removal plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.