पुणे : राज्यात तळकोकणात ३५ वर्षांनंतर सरासरी वेळेपूर्वी दाखल झालेल्या मॉन्सूनने पुण्यातही दाखल होण्याचा विक्रम केला असून पुण्यात मॉन्सून यापूर्वी १९६२ मध्ये २९ मे रोजी दाखल झाला होता. त्यानंतर यंदा मॉन्सून २६ मे रोजीच दाखल झाला आहे. दरम्यान, मॉन्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण अनुकुल असून पुढील तीन ते पाच दिवसांत राज्याच्या अन्य भागांतही तो हजेरी लावेल, अशी माहिती भारतीय हवानमाशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी यांनी दिली.
प्रखर उन्हाळ्यानंतर प्रतीक्षा असते ती मॉन्सूनची अर्थात पावसाच्या आगमानाची. पुण्यात मॉन्सून सरासरी १० जूनपर्यंत दाखल होत असतो. मात्र, यंदा मॉन्सूनने आजवरचा विक्रम मोडला आहे. मॉन्सून यापूर्वी कधीही इतक्या लवकर अर्थात २९ मेपूर्वी रोजी पुण्यात दाखल झाला नव्हता. यापूर्वी १९६२ मध्ये मॉन्सून २९ मे रोजी पुण्यात दाखल झाल्याची नोंद भारतीय हवामानशास्त्र विभागात झाली आहे, अशी माहिती सानप यांनी दिली. ते म्हणाले, ‘मॉन्सूनने यंदा आतापर्यंतच्या सर्वच ठिकाणचे आगमनाचे विक्रम मोडले आहेत. केरळमध्येही तो सरासरी १ जून रोजी दाखल होतो, यंदा २४ मे रोजी अर्थात आठ दिवस आधीच दाखल झाला. त्यानंतर तळकोकणात त्याने आगमानाचा ३५ वर्षांचा विक्रम मोडला आहे. कोकणात २० मे १९९० रोजी मॉन्सून दाखल झाल्याची नोंद आहे. तर पुण्यात मॉन्सूनने आगमनाचा विक्रमच केला आहे. पुण्यात मॉन्सून दाखल होण्याची सरासरी तारीख १० जून आहे. मात्र, मॉन्सून यंदा तब्बल १५ दिवस आधीच दाखल झाला आहे. यापूर्वी १९६२ मध्ये मॉन्सून पुण्यात २९ मे रोजी दाखल झाला आहे. यंदा २६ मे रोजीच दाखल झाल्याने हा एक विक्रमच म्हणावा लागेल.”
मॉन्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण अनुकुल असून येत्या ३ ते ५ दिवसांत मॉन्सून संपूर्ण राज्य व्यापेल. - एस. डी. सानप, वरिष्ठ शास्त्रज्ञ, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे
पुण्यात मे मध्ये मॉन्सून दाखल होण्याच्या तारखा
१९६२ : २९ मे१९७१ : ३१ मे१९९० : ३१ मे२००६ : ३१ मे२०२५ : २६ मे
गेल्या १२ वर्षांतील मॉन्सूनचे पुण्यातील आगमन
२०१३ : ८ जून२०१४ : १५ जून२०१५ : १२ जून२०१६ : २० जून२०१७ : १२ जून२०१८ : ९ जून२०१९ : २४ जून२०२० : १४ जून२०२१ : ६ जून२०२२ : ११ जून२०२३ : २४ जून२०२४ : ९ जून