शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात साथीच्या आजारांचे होणार मॉनिटरिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 13:53 IST

या उपक्रमाद्वारे आरोग्य विभागाच्या विविध सॉफ्टवेअर एकत्रित करण्यात येणार

ठळक मुद्देएकात्मिक आरोग्य माहिती व्यवस्थापन उपक्रम १ तारखेपासून होणार सर्वेक्षणास सुरुवातआरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरूजिल्ह्यात या संदर्भात आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात

पुणे : साथींच्या आजारांची एकत्रित माहिती घेण्यासाठी तसेच त्यानुसार उपाययोजना करण्यासाठी एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन उपक्रमांतर्गत जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरावर मोबाईल अ‍ॅप्लिकेशन आणि सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून, आरोग्य कर्मचारी गावोगावी घरी जाऊन आजारांची माहिती घेऊन या अ‍ॅप्लिकेशनवर माहिती अपलोड करणार आहे. त्याद्वारे रोगांचे मॉनिटरिंग करण्यात येणार आहे. जिल्ह्यात या संदर्भात आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली असून, आठ तालुक्यांत हे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे . १ तारखेपासून या सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे.दरवर्षी वातावरणातील बदलांमुळे साथीचे आजार पसरत असतात. अचानक आलेल्या आजारामुळे उपाययोजना करण्यावर मर्यादा येतात. त्यामुळे केंद्र सरकातर्फे एकात्मिक आरोग्य माहिती व्यवस्थापन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे आरोग्य विभागाच्या विविध सॉफ्टवेअर एकत्रित करण्यात येणार आहेत. सध्या राज्यात हा उपक्रम राबविण्यात येत असून, पुणे जिल्ह्यातही त्याचे काम सुरू झाले आहेत. साथीच्या आजारांची माहिती घेण्यासाठी अ‍ॅप्लिकेशन आणि सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. मोबाईल आणि टॅबवर हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करून आरोग्य कर्मचाºयांना ते देण्यात येईल. घरोघरी जाऊन हे कर्मचारी आजारांबाबत माहिती घेऊन तत्काळ त्याची माहिती या अ‍ॅप्लिकेशनवर अपलोड करणार आहेत. तालुका आणि जिल्हा स्तरावरील माहिती एकत्र करून ती राज्यस्तरावर पाठविण्यात येणार आहे. तर, राज्यस्तरावरील माहिती केंद्रस्तरावर पाठविण्यात येईल. याद्वारे भविष्यात आरोग्य विभागाची एकत्रित माहिती गोळा करण्यात येणार आहे.याबाबत माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार म्हणाले, ‘‘या अ‍ॅप्लिकेशनबाबत जिल्ह्यात आरोग्य कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत आठ तालुक्यांत प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. एक तारखेपासून जिल्ह्यातील ५३९ आरोग्य केंद्रे अणि ९० उपकेंद्रांद्वारे हे सर्वेक्षण गावोगावी करण्यात येणार आहे. येत्या १ तारखेपासून या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात येईल..........उपक्रेंद्र स्तरावर एक मोबाईल आणि टॅबलेटद्वारे आरोग्यसेविका-सेवक तसेच आशा सेविकांमार्फेत हे सर्वेक्षण गावोगावी राबविण्यात येणार आहे. घरोघरी जाऊन माहिती घेऊन मोबाईलद्वारे एकात्मिक आरोग्य माहिती व्यवस्थापन उपक्रम अ‍ॅप्लिकेशनवर ही माहिती लगेच अपलोड करण्यात येईल. तसेच, जिओ टॅगिंगही करण्यात येईल. ४दिवसाला १०० घरे, असे सर्वेक्षणाचे उद्दिष्ट असून, महिन्यातून दोनदा सर्वेक्षण करण्याचे नियोजन आहे. या सर्वेक्षणाचा ट्रेंड समजून भविष्यात येणाºया आजारांवर उपाययोजना करण्यात येणार आहेत. .........साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, तसेच त्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी एकात्मिक आरोग्य माहिती व्यवस्थापन उपक्रम जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहे. येत्या १ तारखेपासून याला सुरवात होणे अपेक्षित आहे.- भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी.......देशात सात राज्यांत उपक्रम सुरू४एकात्मिक आरोग्य सर्वेक्षण उपक्रम देशात सात राज्यांत सुरू करण्यात आला आहे. याद्वारे साथीच्या आजारांवर लक्ष ठेवण्यात येईल. भविष्यात संपूर्ण देशात हा उपक्रम लागू केला जाणार आहे.......

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सGovernmentसरकार