शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

जेव्हा कुंपणच शेत खाते! मृत्यू पावलेल्या खातेधारकाचे बँक अधिकाऱ्यांनीच काढले पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 22:02 IST

बनावट सह्या करुन २४ मार्च रोजी बँक खात्यातून काढले तब्बल २ लाख ३७ हजार रुपये.....

पुणे : आजारी व ज्येष्ठ नागरिकांना घरपोच बँकिग सेवा देताना इंडसइंड बँकेतील महिला रिलेशनशिप मॅनेजर व व्यवस्थापकाने खातेधारकाच्या बँक खात्यातून बनावट सहीद्वारे परस्पर पैसे काढून अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी बँकेच्या मॅनेजरसह महिला अधिकार्‍याला अटक केली आहे. 

जुबेर गांधी (वय ३४) आणि अंकिता रंजन (वय ३०, रा. विमाननगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

याप्रकरणी चंद्रशेखर राजगोपालन (रा. विमाननगर) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. राजगोपालन यांच्या वडिलांचे इंडसइंड बँकेच्या विमाननगर शाखेत बचत खाते आहे. त्यांचे वडिल ज्येष्ठ नागरिक व आजारी असल्याने त्यांच्या खात्याचा व्यवहार बँकेतील रिलेशनशिप मॅनेजर अंकिता रंजन व व्यवस्थापक जुबेर गांधी हे घरी येऊन आवश्यक ती मदत करीत होते. राजगोपालन यांच्या वडिलांचे १० मार्च रोजी निधन झाले. त्यानंतर चंद्रशेखर यांना त्यांचे वडिलांचे मोबाईलवर निपॉन इंडिया म्युच्यअल फंड या कंपनीचा एसएमएस प्राप्त झाला. त्यात २२ मार्च रोजी केलेल्या विनंतीमध्ये खातेधारकाची सही बनावट असल्याने व्यवहार पूर्ण करता येत नाही, असे नमुद करण्यात आले होते. त्यामुळे चंद्रशेखर राजगोपालन यांना संशय आल्याने त्यांनी इंडसइंड बँकेत जाऊन मेसेज बँकेतील अधिकार्‍यांना दाखविला. वडिलांचे निधन झाले असताना अशा प्रकारचा संशयास्पद मेसेज आल्याने त्यांनी वडिलांच्या खात्याची माहिती घेतली. तेव्हा वडिलांच्या खात्यावर फक्त ४ हजार ५९६ रुपये शिल्लक असल्याने दिसून आले. त्यांनी विमानतळ पोलिसांकडे धाव घेतली. राजगोपालन यांच्या खात्यावर असलेले फिक्स डिपॉझिट बंद करण्याकरीता त्यांच्या वडिलांच्या सह्यासारख्या सह्या करुन २४ मार्च रोजी त्यांच्या खात्यातून २ लाख ३७ हजार रुपये कोणीतरी काढून घेतल्याचे दिसून आले. तसेच त्यांच्या वडिलांच्या खात्याची केवायसीमध्ये बदल करताना मुळ मोबाईल नंबरमध्ये बदल करुन बँकेत झालेल्या व्यवहाराचे मेसेजची माहिती मिळू नये, म्हणून बँकेच्या व्यवस्थापकांनीच दुसर्‍या मोबाईलची नोंद करण्यात आली. निपॉन इंडिया म्युच्युअल फंड या कंपनीमध्ये सादर करण्यात आलेला अर्ज हा राजगोपालन यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर करण्यात आला. हा सर्व प्रकार बँकेतील अधिकार्‍यांनीच केल्याचे निष्पन्न झाल्यावर विमानतळ पोलिसांनी गांधी आणि रंजन यांना सोमवारी अटक केली. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी सांगितले की, ही अफरातफर केल्यानंतर जुबेर गांधी याची आता लष्कर येथील शाखेत बदली झाली होती. तर अंकिता रंजन हि दुसरीकडे नोकरी करीत आहे. दोघांना अटक करण्यात आली असून ६ मेपर्यंत न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या दोन अधिकार्‍यांनी अशा प्रकारे आणखी काही खातेधारकांची फसवणूक केली असल्याची शक्यता आहे. त्यांनी विमानतळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.ही कामगिरी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन जाधव करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसbankबँकfraudधोकेबाजी