शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांना गावात जाऊन देणार पैसे : सात उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 14:46 IST

पैसे घेण्यास ४०० प्रकल्पग्रस्तांचा विरोध.. 

ठळक मुद्देआत्तापर्यंत ६२१ जणांना ७२ कोटी दिले; अन्य १६० लाभार्थ्यांना येत्या दोन दिवसांत पैशाचे वाटप

पुणे : वर्षानुवर्षे भिजत घोंगडे असलेले भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी व लाभार्थ्यांना त्यांच्या गावात जाऊन पैसे वाटपासाठी खास सात उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आतापर्यंत सुमारे ६२१ प्रकल्पग्रस्तांना ७२ कोटी ४८ लाख रुपयांचे वाटप केले आहे. तर अन्य १६० लाभार्थ्यांना येत्या दोन दिवसांत पैशाचे वाटप करण्यात येईल, असे जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे यांनी सांगितले.आमच्या शेतीला पाणीच मिळणार नसल्याचे सांगत हवेली, दौंड तालुक्यांतील शेतकऱ्यांनी पुनर्वसनासाठी जमीन देण्यासाठी नकार दिला. शेकडो प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी प्रकल्पग्रस्तांना प्रत्येकी हेक्टरी १५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला. दोन्ही महापालिकेकडून पैसे वाटपासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला निधी दिला.....................

पैसे घेण्यास ४०० प्रकल्पग्रस्तांचा विरोध भामा-आसखेड प्रकल्पासाठी जमीन घेताना शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्यात जमीन देणार असे सांगितले. परंतु, प्रकल्पाचे सिंचन क्षेत्र रद्द झाल्यानंतर जमीन वाटप करणे अडचणीचे झाले. यामुळे सुमारे ३५०-४०० प्रकल्पग्रस्तांनी जमिनीच्या मोबदल्यात जमीन मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. यामुळेच सुमारे ४०० लाभार्थी जमिनीच्या बदल्यात जमीन मिळण्यावर ठाम आहेत. दरम्यान आतापर्यंत २०१ प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप केले आहे. 

..........................

मागील सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर

भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकरी जिवाची पर्वा न करता आंदोलनातून आपल्या हक्काच्या पुनर्वसनाची लढाई लढत आहेत. मात्र,मागील सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे व शासकीय बाबूंनी पुनर्वसनाबाबत ठोस निर्णय न घेतल्यानेच पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर झाला आहे अशी टीका आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली.

टॅग्स :KhedखेडWaterपाणीFarmerशेतकरीDamधरणState Governmentराज्य सरकारagitationआंदोलन