शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम वर्षाच्या परीक्षेला १२ ऑक्टोबरनंतरचा 'मुहूर्त' ; प्रश्नसंच तयार करण्याचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 14:42 IST

अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता

ठळक मुद्देवेळापत्रक तयार करण्यात अडचण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात 'नेट', 'यूपीएससी' व 'एमपीएससी'च्या परीक्षा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा येत्या १ ऑक्टोबरपासून घेण्याचे निश्चित केले असले तरी; अद्याप सर्व विषयांचे प्रश्नसंच तयार करण्याचे काम पूर्ण झाले नाही.तसेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात 'नेट', 'यूपीएससी' व 'एमपीएससी'च्या परीक्षा असल्यामुळे विद्यापीठाने परीक्षेसाठी येत्या १२ ऑक्टोबरनंतरचा मुहूर्त काढला असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.सर्वोच्च न्यायालय व राज्य शासनाच्या आदेशानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या कामाला तात्काळ सुरुवात केली. विद्यापीठाच्या अधिष्ठाता त्यांनी सर्व विषयाच्या अभ्यास मंडळाची बैठक घेऊन प्रश्नसंच तयार करण्याबाबत सूचना दिल्या. २३ सप्टेंबरपर्यंत सर्व विषयाचे प्रश्नसंच तयार होणे अपेक्षित होते. मात्र, मराठी व इंग्रजी भाषा विषयातील प्रश्नसंच तयार करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे ऑनलाईन परीक्षेसाठी आवश्यक असणारे ' एमसीक्यू' चे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. प्रश्नसंच तयार करण्याचे काम सुमारे ७५ टक्‍क्‍यांपर्यंत झाले आहे. त्यामुळेच विद्यापीठाने प्रत्येक विषयाच्या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध केले नाही.  विद्यापीठातर्फे १ ते ९ ऑक्टोबरपर्यंत 'बॅकलॉग'च्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. तर १० ते ३० ऑक्टोबर या कालावधीमध्ये नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले होते. मात्र, आता बॅकलॉग च्या विद्यार्थ्यांची परीक्षा ७ ऑक्टोबरनंतर तर नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा १२ ऑक्टोबरनंतर घेतली जाण्याची शक्यता आहे.        विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांमध्ये सुमारे ३ हजार ३०० विषय शिकविले जातात. या प्रत्येक विषयासाठी आवश्यक प्रश्नसंच तयार करण्यात उशीर होत आहे. त्यातच ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १ , ५ व ९ ऑक्टोबर रोजी नेट परीक्षा आहे. तर ४ ऑक्टोबर रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाची आणि ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार आहे. यातील काही परीक्षांना विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे अनेक विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे.---------------------परीक्षेचे वेळापत्रकच तयार नाही 

 ऑनलाईन परीक्षा घेण्यात तरबेज असणाऱ्या एजन्सीची अद्याप निवड झालेली नाही. निवड केल्या जाणाऱ्या एजन्सीला किती दिवसात परीक्षेचे नियोजन करता येऊ शकते, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे विद्यापीठाने अद्याप परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. परिणामी विद्यापीठाला अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करावा लागणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीexamपरीक्षाEducationशिक्षणPune universityपुणे विद्यापीठ