पुणे : ट्रॅव्हल बसमध्ये प्रवासात सीटवर झोपलेल्या युवतीच्या कंबरेत हात घालून तिचा विनयभंग करणार्या चालकाविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्र शर्मा असे या ड्रायव्हरने हे गैरकृत्य केले असून अद्याप त्याला अटक करण्यात आली नाही. पीडित युवती 7 फेब्रुवारी रोजी भंडाऱ्यावरून पुण्याला येत होती. महिंद्रा ट्रॅव्हल (सीजी 19 एफ 0280)मधून प्रवास करत असताना तिला झोप लागली होती. अचानक तिच्या कमेरेत कोणी तरी हात घातल्याचे तिला जाणवले. शेजारी बसचा ड्रायव्हर राजेंद्र शर्मा हा उभा होता. यावर पीडित युवतीने त्याला विचारणा केली असता, मी अनेक वेळा असे केले आहे. आतापर्यंत अनेक मुलींसोबत मी झोपून आलो आहे. कोणीही मला अडवले नाही. असे निर्लज्जपणे म्हणत पीडित युवतीचा विनयभंग केला. त्यानंतर ती खराडी येथे उतरून घरी गेली. या गंभीर प्रकरणी युवतीने लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सदरचा गुन्हा त्यांनी विमानतळ पोलीस स्टेशनला वर्ग केला.बुधवारी (दि.17)रोजी रात्री विमानतळ पोलिसांनी आरोपी ड्रायव्हरविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक आठरे करीत आहेत. तब्बल दहा दिवसांनी झाला गंभीर गुन्हा दाखल ड्रायव्हरने विनयभंग केल्याची गंभीर घटना पोलिसांनी गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. 7 फेब्रुवारी रोजी घटना घडल्यानंतर पीडित युवतीने दुसर्या दिवशी लोणी काळभोर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. मात्र या गंभीर घटनेबाबत पुन्हा हद्दीचे कारण देत गुन्हा नेमका कुठे घडला? कुठे सुरू झाला? युवती बस मधून कुठे उतरली? या बाबींवर ग्रामीण पोलिसांनी पुन्हा पुणे शहर पोलिस आयुक्त कार्यालयात पाठवला. तब्बल दहा दिवसांनी विमानतळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला.
प्रवासी युवतीचा ड्रायव्हरकडून विनयभंग;आरोपी ड्रायव्हरविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 15:21 IST
तब्बल दहा दिवसांनी झाला गंभीर गुन्हा दाखल
प्रवासी युवतीचा ड्रायव्हरकडून विनयभंग;आरोपी ड्रायव्हरविरुद्ध गुन्हा दाखल
ठळक मुद्देआरोपी ड्रायव्हरविरुद्ध विमानतळ पोलीस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल