अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By Admin | Updated: February 15, 2017 02:25 IST2017-02-15T02:25:52+5:302017-02-15T02:25:52+5:30
महापालिकेच्या शाळेतील दुसरीच्या विद्यार्थिनीला खडू आणायला सांगत तिचा विनयभंग करण्यात आला. शाळेमध्ये रंगाचे काम करण्यासाठी आलेल्या

अल्पवयीन मुलीचा विनयभंग
पुणे : महापालिकेच्या शाळेतील दुसरीच्या विद्यार्थिनीला खडू आणायला सांगत तिचा विनयभंग करण्यात आला. शाळेमध्ये रंगाचे काम करण्यासाठी आलेल्या आरोपीने हे कृत्य केले असून त्याला वारजे पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना वारज्यातील रामनगर भागात सोमवारी घडली. हा प्रकार समजल्यानंतर शाळा प्रशासनाने मात्र पोलिसांकडे तक्रार करू नका, अशी विनंती नातेवाईकांना केल्याचे समोर आले आहे.
मोरेश्वर महादेव काने (वय ४५, रा. कर्वेनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : पीडित मुलगी आठ वर्षांची असून ती रामनगर परिसरातील मनपा शाळेमध्ये शिकण्यास आहे. आरोपीचे लग्न झालेले असून त्याला मुले आहेत. शाळेच्या कार्यालयामधील रंगकामासाठी त्याला बोलावण्यात आले होते.
याप्रकरणी शाळा प्रशासनाकडे जाब विचारताच त्यांनी पोलिसांत तक्रार करू नका, अशी विनंती केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. शाळेकडून कारवाई केली जाणे अपेक्षित असताना हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न का केला गेला, असा प्रश्न नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)