प्रवासी महिलेचा विनयभंग
By Admin | Updated: April 26, 2016 01:40 IST2016-04-26T01:40:36+5:302016-04-26T01:40:36+5:30
खासगी टेम्पोतून प्रवास करणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील टेम्पोचालकास चाकण पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती ठाणे अंमलदार अनिल जगताप व सतीश जाधव यांनी दिली.

प्रवासी महिलेचा विनयभंग
चाकण : खासगी टेम्पोतून प्रवास करणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील टेम्पोचालकास चाकण पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती ठाणे अंमलदार अनिल जगताप व सतीश जाधव यांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गुन्हा आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला
असून, याप्रकरणी महादेव लक्ष्मण तांबे (वय ३८, रा. राधाकृष्णनगर, अशोकनगर, सातपूर, नाशिक) या चालकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, की मंचर येथील २६ वर्षीय महिला ही अवसरी खुर्द येथून चाकणला येण्यासाठी टेम्पोतून प्रवास करीत होती.
येथील आंबेठाण चौकात टेम्पो थांबला असता दरवाजा उघडण्याचा बहाणा करून चालकाने छातीला धक्का देत महिलेस लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मुख्तार शेख पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)