शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

Pune | गुंगीचे औषध देऊन बलात्कार; धमकी देत आरोपीच्या मित्रानेही केले अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 13:31 IST

बिअरमध्ये गुंगीचे औषध टाकून ते त्या तरुणीला पाजून बलात्कार...

वाघोली (पुणे) : पार्टीला घेऊन गेल्यानंतर बियरमध्ये गुंगीचे औषध टाकून एक तरुणाने एका तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. तरुणीवर बलात्कार केल्यानंतर त्या तरुणीचे फोटो, व्हायरल करण्याची धमकी देऊन मित्रासोबत देखील शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील चंदननगर परिसरात उघडकीस आला आहे.

याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी मयुर दत्तात्रय सातव (वय.21,रा. आव्हाळवाडी, सातव आळी वाघोली) याला अटक केली आहे. तर त्याचा मित्र शशिकांत कदम (रा. सोमनाथनगर वडगावशेरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत लोहगाव येथील 20 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. ही घटना मार्च ते जुलै 2022 या कालावधीत सोमनाथनगर वडगावशेरी व केसनंद येथील हॉटेलमध्ये घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी ग्रामीण भागातून येऊन पुण्यात  शिक्षण घेते. ती तरुणी नोकरीच्या शोधात असताना एका मैत्रीणीच्या माध्यमातून तिचा आरोपी शशिकांत याच्यासोबत परिचय झाला होता. त्यावेळी त्याने तो स्पा सेंटर सुरू करणार असून, तिला तेथे मॅनेजर म्हणून नोकरी देतो असे सांगितले. त्यातूनच ओळख वाढत गेल्यानंतर एकेदिवशी पार्टीला तरुणीला तो घेऊन गेला.

तेथे बिअरमध्ये गुंगीचे औषध टाकून ते त्या तरुणीला पाजून बलात्कार केला. त्याने खासगी क्षणातील फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढले होते. जेव्हा तरुणीला जाग आली, तेव्हा त्याने तिला हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर तो वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. काही दिवसानंतर शशिकांत याने तरुणीला तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याचा मित्र मयुर याच्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले.

मयुर यानेदेखील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने त्याच्यासोबतचे संबंध तोडले होते. मात्र, त्यानंतर देखील तो वारंवार तरुणीला फोन करून पाठलाग करत त्रास देत होता. त्यामुळे सतत होणार्‍या त्रासाला कंटाळून तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून मयुर सातव याला अटक केली असून, त्याच्या फरार मित्राचा शोध घेत आहेत.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पालवे करीत आहेत.

 

टॅग्स :chandan nagar policeचंदननगर पोलीसPuneपुणेMolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारी