शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यांपासून चकवा देणारा मोक्कातील फरारी चिपळूणमधून अटक; सिंहगड रस्ता पोलिसांची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2023 17:26 IST

सुरज संतोष ढवळे (वय: १९, रा. देशमुख प्लाझा शेजारी, साईनगर, हिंगणे-खुर्द, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव

धायरी : तब्बल आठ महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत मोक्कातील फरारी आरोपीला रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण येथून सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली आहे. सुरज संतोष ढवळे (वय: १९, रा. देशमुख प्लाझा शेजारी, साईनगर, हिंगणे-खुर्द, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरज ढवळे आणि त्याच्या साथीदारांविरूध्द सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहेत. त्या गुन्हयातील आरोपींविरूध्द मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. ढवळेच्या इतर साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, ढवळे हा गेल्या आठ महिन्यापासुन फरार होता. 

ढवळे हा रत्नागिरी जिल्हयातील चिपळुन येथे असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन निकम यांना मिळाली होती. त्याबाबत त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना कळविले होते. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिस पथकाने चिपळुन येथे जाऊन स्थानिक पोलिसांची मदत घेवून आरोपी ढवळेला अटक केली आहे. गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे करीत आहेत. पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा, सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, पोलिस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन निकम, पोलिस उपनिरीक्षक गणेश मोकाशी, सहाय्यक उपनिरीक्षक आबा उत्तेकर, पोलिस अंमलदार संजय शिंदे, विकास पांडुळे, विकास बांदल, देवा चव्हाण, सागर शेडगे, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, स्वप्नील मगर, दक्ष पाटील, अमोल पाटील, अमित बोडरे आणि अविनाश कोंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

टॅग्स :PuneपुणेSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीसChiplunचिपळुणSocialसामाजिकCrime Newsगुन्हेगारी