शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मोहिते यांचा बाजार समितीचा अर्ज रद्द

By admin | Updated: August 23, 2015 04:14 IST

खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी खेड तालुका बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज जिल्हा उपनिबंधकांनीही फेटाळला आहे.

पुणे/राजगुरुनगर : खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी खेड तालुका बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज जिल्हा उपनिबंधकांनीही फेटाळला आहे. त्यामुळे त्यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग आता बंद झाला आहे. बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. या निवडणुकीत कृषी पतसंस्था मतदार संघातून मोहिते यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, अनिल रामचंद्र राक्षे आणि चांगदेव रामचंद्र शिवेकर यांनी त्यांच्या अर्जावर हरकत घेतल्याने छाननीत निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी हा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे मोहिते यांनी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांच्याकडे अपिल केले होते. शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या सुनावणीनंतर उपनिबंधकांनीही अर्ज फेटाळला आहे. तसा निकालही त्यांनी दिला आहे. उपनिबंधक कार्यालयातून या माहितीस दुजोरा देण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम १९६३ च्या कलम ४१ नुसार संचालक हे पदावर असताना वैयक्तिक अथवा एखाद्या कंपनीचे भागीदार म्हणून बाजार समितीशी एखाद्या सेवेसाठी आर्थिक व्यवहार करु शकत नाहीत. मात्र, मोहिते हे संचालक असलेल्या डीडीएम सनक्राफ्ट सोलर सिस्टीम प्रा. लि. या कंपनीने एका सौरउर्जा प्रकल्पासाठी बाजार समितीशी व्यवहार केलेला आहे. त्यामुळे ते बाजार समितीचे लाभार्थी ठरत असल्याने त्यांच्या अर्जाला हरकत घेण्यात आली होती. ही हरकत व नियम विचारात घेऊन अर्ज रद्द ठरविण्यात आला आहे. सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे उपनिबंधकांनी हा निर्णय दिला आहे. मी सोमवारी उच्च न्यायालयात अपील करणार असून तेथे मला नक्कीच न्याय मिळेल असे मोहीते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)