महंमद पैगंबर जयंती साजरी
By Admin | Updated: January 5, 2015 00:45 IST2015-01-05T00:45:18+5:302015-01-05T00:45:18+5:30
भव्य मिरवणूक काढून, अल्पोपाहार, सरबताचे वाटप, औषधवाटप, नेत्र तपासणी शिबिर असे विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम

महंमद पैगंबर जयंती साजरी
पिंपरी : भव्य मिरवणूक काढून, अल्पोपाहार, सरबताचे वाटप, औषधवाटप, नेत्र तपासणी शिबिर असे विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम राबवून शहरात मुस्लीम बांधवांनी महंमद पैगंबर जयंती साजरी करण्यात आली. शहरात जल्लोष मोठ्या प्रमाणावर साजरा झाला.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर मिरवणुकीचा जल्लोष दिसून येत होता. धर्माचे ध्वज आसमंतात फडकावून तरुणाईच्या उत्साहाला उधान आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात येणारे रस्ते मुस्लिमबांधवांच्या गर्दीने फुलून गेले होते. काळेवाडी ते पिंपरी, नेहरूनगर ते पिंपरी, निगडी ते पिंपरी या रस्त्यावर जागोजागी रस्त्यावर विविध संघटनांच्या वतीने फलक लावले होते. धर्माच्या पताका फडकत होत्या. तसेच चहा, सरबत, अल्पोपाहाराचे वाटप करण्यात येत होते. तरुण मुले-मुली, ज्येष्ठांचाही सहभाग उल्लेखनीय होता. सर्व विभागातील मिरवणुका पिंपरीतील आंबेडकर चौकामागील मोकळ्या पटांगणात येत होत्या. तेथे मुस्लीम बांधवांचे स्वागत केले जात होते. रात्री उशिरापर्यंत मिरवणुकांचा जल्लोष सुरू होता. निगडीतून निघालेल्या मिरवणुका
आकुर्डी, चिंचवड स्टेशन, मोरवाडी चौकातून पिंपरीत आणि काळेवाडीतून पिंपरीत येणाऱ्या वाहतुकीचे नियोजन केले होते.