मोदीजी..तुम्ही कठोर निर्णय घ्या..सैन्याला लागणारी मदत गोळा करण्यास आम्ही सुरुवात केलीय..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 04:26 PM2019-02-16T16:26:51+5:302019-02-16T16:28:50+5:30

पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले तसेच असंख्य जखमी झाले आहेत.

Modiji .. You make tough decisions .. We have started to collect fund to national defence | मोदीजी..तुम्ही कठोर निर्णय घ्या..सैन्याला लागणारी मदत गोळा करण्यास आम्ही सुरुवात केलीय..

मोदीजी..तुम्ही कठोर निर्णय घ्या..सैन्याला लागणारी मदत गोळा करण्यास आम्ही सुरुवात केलीय..

Next
ठळक मुद्देगणेश बोरा यांनी या जवानांच्या कुटुंबियांसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा मदत निधी उभारण्याचे काम केले सुरु

पिंपरी (रावेत) : पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले तसेच असंख्य जखमी झाले आहेत. ही घटना वाचून,ऐकून आणि पाहून हृदय पिळवटणार नाही असा एकही माणूस भारतात सापडणार नाही. या संकटानंतर देशभर सर्वत्र सहानुभूतीची आणि दु:खाची लाट पसरली. शहीद झालेल्या सर्व जवानांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पण भारत देशाचे नागरिक म्हणून आपली एवढीच जबाबदारी आहे का? मनातील खदखद कुठेतरी व्यक्त झाली म्हणजे आपले कर्तव्य संपणार आहे का ? या प्रश्नांची उत्तर सोशल मीडियावरील तरुणांनी शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून एक भारतीय नागरिक म्हणून राष्ट्रीय सुरक्षा निधीसाठी आर्थिक मदत करण्याचे अनोखे कार्य उभे राहिले.
 सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे गणेश बोरा यांनी या जवानांच्या कुटुंबियांसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा मदत निधी उभारण्याचे काम हाती घेतले . या कार्यात प्रत्येक देशभक्त आणि सामाजिक भान जागृत असणाऱ्या भारतीयाने आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे असे आवाहन गणेश बोरा यांनी  केले होते. काल राष्ट्रीय सुरक्षा निधीसाठी स्वत: पासून त्यांनी सुरवात करत ५०० रुपये निधी दिला आणि सोशल मीडियामधुन आवाहन केले होते की सर्वांनी निधी दयावा ज्यामुळे  पंतप्रधानांना पाकिस्तान आणि दहशतवाद विरोधी युद्धात निधी कमी पडण्याची चिंता वाटणार नाही आणि ते कठोर पाऊले उचलण्यास मागे हटणार नाहीत या आव्हानाला कालपासून असख्य नेटिझनसनी मोठया प्रमाणात प्रतिसाद देत आपल्या आपल्या परीने मदत करण्यास सुरुवात केली आहे. 
कुणाचे प्राण वाचवण्यासाठी प्राण त्यागणे याच्या इतका निस्सीम त्याग अन्य कोणत्याही गोष्टीत नाही. म्हणूनच असा त्याग करणार-या भारतीय जवानांच्या कुटुंबियांना आणि युद्ध जन्य परिस्थिती निर्माण झाली तर देशाला निधी कमी पडू नये या करिता आपापल्या परीने मदत करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. या भावनेतून सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे गणेश बोरा यांनी या जवानांच्या कुटुंबियांसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा मदत निधी उभारण्याचे काम हाती घेतले ल्लाि. ndf. gov.in या वेबसाईटवर जाऊन आपण आॅनलाईन पैसे देऊ शकतो शिवाय दिलेल्या निधीला आयकरात सवलत मिळते. 

Web Title: Modiji .. You make tough decisions .. We have started to collect fund to national defence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.