शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

'फाळणी वेदना स्मृती दिन' पाळण्याऐवजी मोदींनी 'महापश्चाताप दिन' पाळावा : काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 21:06 IST

फाळणीपेक्षा टाळेबंदीत जास्त हाल

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ऑगस्ट हा 'फाळणी वेदना स्मृती दिन' म्हणून पाळला जाणार असल्याची घोषणा केली. आता काँग्रेसनेनरेंद्र मोदींच्या याच घोषणेवर जोरदार टीका केली आहे. यात 'फाळणी वेदना दिन' पाळण्याऐवजी पंतप्रधान मोदी यांनी देशभर टाळेबंदी जाहीर केली तो दिवस 'महापश्चाताप दिन' म्हणून पाळावा अशा शब्दात काँग्रेसने निशाणा साधला आहे. 

भारत -पाकिस्तान फाळणीची घटना वेदनादायी होती. तिरस्कार व हिंसाचारामुळे आमच्या लाखो बहिणी आणि भावांना विस्थापित व्हावे लागले होते.ही वेदना कधीही विसरता येणार नाही. या घटनेत अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले होते असे मोदी यांनी ट्विटमध्ये विशद करत १४ ऑगस्ट हा दिवस 'फाळणी वेदना स्मृती दिन' म्हणून पाळला जाणार असल्याचे जाहीर केले होते. याच घोषणेवर काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी टीकास्र सोडले आहे. 

तिवारी म्हणाले, फाळणी ही तत्कालीन अपरिहार्य घटना होती. त्यात दोन्ही बाजूंचे दीड कोटी लोक बाधीत झाले. त्या जखमांवरची खपली सतत काढत राहणे हा भाजपाचा नेहमीचा उद्योग आहे.

आताही मोदी यांनी तेच केले असे स्पष्ट करताना तिवारी म्हणाले, स्वतंत्र भारतात मोदी़नी पंतप्रधान म्हणून तुघलकी आवेशात एका रात्रीत कोणालाही कसलीही पूर्व कल्पना न देता जी टाळेबंदी केली त्यात आपल्याच देशातले साडे आठ कोटी स्थलांतरीत बाधीत झाले. पायी घरी निघाले, त्यात त्यांचे खाण्याचे राहण्याचे हाल झाले. काहींना म्रुत्यूही आला. त्यामुळे मोदी व त्यांच्या भाजपाने स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला नकाराश्रू ढाळण्याऐवजी तुघलकी टाळेबंदी जाहीर केली. तो २४ मार्च हा दिवस 'महापश्चाताप दिन' म्हणून यापुढे दरवर्षी पाळावा.

काय म्हणाले होते मोदी.... फाळणीमध्ये विस्थापित व्हावे लागलेल्या आणि प्राण गमवाव्या लागलेल्या आमच्या लाखो बंधू भगिनींच्या बलिदानाला लक्षात ठेवण्यासाठी १४ ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळला जाणार असल्याचे जाहीर केलं. १४ ऑगस्ट हा दिवस आम्हाला भेदभाव, वैमनस्य आणि वाईट भावनांच्या विषाला संपविण्यासाठी केवळ प्रेरितच करणार नाही,तर यामुळे एकता ,सामाजिक सद्भावने आणि मानवी संवेदनांना आणखी मजबूत करणार आहे मोदी म्हणाले होते.

 

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा