आधुनिक भातशेतीला हवे प्राधान्य
By Admin | Updated: August 4, 2014 04:32 IST2014-08-04T04:32:15+5:302014-08-04T04:32:15+5:30
भातशेती करताना पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक पद्धतीने शेती करण्यास शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्यास वेळ, ऊर्जा व पैशाची बचत

आधुनिक भातशेतीला हवे प्राधान्य
गहुंजे : भातशेती करताना पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक पद्धतीने शेती करण्यास शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्यास वेळ, ऊर्जा व पैशाची बचत होऊन भाताच्या उत्पादनात वाढ करणे शक्य असल्याचे मत कृषी विभागातील अधिकारी व
शेतकरी व्यक्त करीत आहेत. मावळ तालुक्यात सुमारे नऊ हजार सातशे हेक्टर क्षेत्र भात लागवडीसाठी उपलब्ध आहे. भात पिकाला आवश्यक असणारा पाऊस मावळात पडत असल्याने पूर्वी पासून आजतागायत भात शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा सर्वाधिक काळ दिसून येतो. आजमितीला मावळात एकूण क्षेत्राच्या सुमारे पन्नास टक्क्यांहून अधिक भात लागवड पूर्ण झाली आहे. चांगला पाऊस पडल्याने भात लावणीची कामे सुरु आहेत.