जनजागृतीच्या ‘संकल्पा’चा आदर्श

By Admin | Updated: January 20, 2015 00:42 IST2015-01-20T00:42:20+5:302015-01-20T00:42:20+5:30

वडिलांना अर्धांगवायुमुळे अपंगत्व आल्यामुळे घराची जबाबदारी आता स ‘तिच्या’वरच पडली होती. स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडणा-या तिने स्वत:चा व्यवसाय सुरु केला.

Model of the 'Sankalpa' of the people | जनजागृतीच्या ‘संकल्पा’चा आदर्श

जनजागृतीच्या ‘संकल्पा’चा आदर्श

पुणे : वडिलांना अर्धांगवायुमुळे अपंगत्व आल्यामुळे घराची जबाबदारी आता स ‘तिच्या’वरच पडली होती. स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडणा-या तिने स्वत:चा व्यवसाय सुरु केला. परंतु ही उमेद एका अपघाताने मावळली. घरातील गॅस गिझरची गळती झाल्याने या तरुणीला प्राण गमवावे लागले. तिच्या अकस्मित जाण्यामुळे बसलेल्या धक्क्यातून सावरत या कुटुंबाने गॅस गिझर वापराबाबत जनजागृती करण्याचा संकल्प करीत एक आदर्श घालून दिला आहे.
संकल्पाचे मामा प्रशांत जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संकल्पाने पुण्यात आल्यावर ‘शेड्स डिझाईन्स अ‍ॅन्ड मोअर’ या नावाने तिने सुरु केलेल्या व्यवसायाचा आईवडिलांना अभिमान होता. संकल्पा उत्कृष्ट कामांच्या पोस्ट फेसबुकवरील तिच्या अकाऊंटवर टाकत होती.
या घटनेची माहिती मिळाल्यावर सर्व नातेवाईक जमले. ठाण्यामध्ये राहणारे तिचे मामा प्रशांत जोशीही आले. घरात करणारे दुसरे कुणीही नसल्यामुळे त्यांनीच शेवटचे कार्य पार पाडले. संकल्पाचा मृत्यू ज्या कारणामुळे झाला, त्या कारणामुळे अन्य कोणाच्याही घरामध्ये दुर्घटना घडू नये म्हणून संकल्पाचे आई वडील व मामांनी गॅस गिझरच्या वापराबाबत जागरुकता बाळगण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली. तिच्या मृत्यूला अवघा एक दिवस होतो न होतो तोच कुटुंबियांनी इतरांसोबत ही घटना घडू नये म्हणून सुरु केलेली जागरुकता आदर्शवत आहे.(प्रतिनिधी)

गॅसगळतीत अडकलेल्या व्यक्तीच्या श्वासोच्छ्वासाकडे लक्ष देणे सर्वात जास्त गरजेचे असते. अशावेळी गॅसगळती तातडीने बंद करावी. घराचे दरवाजे, खिडक्या उघडाव्यात आणि बाहेरची हवा घरात येऊ द्यावी. जी व्यक्ती गॅसगळतीमध्ये अडकली होती, त्याच्या फुफ्फ ुसात गॅस जाऊन त्याचा परिणाम श्वसनावर होऊन गुदमरून लगेचच मृत्यू होऊ शकतो. यामुळे अशा व्यक्तीचा श्वासोच्छ्वास चालू ठेवण्याचा प्रयत्न करावा. यासाठी एअर वे ओपन ही पद्धत अवलंबवावी. या पद्धतीमध्ये संबंधित व्यक्तीची मान मागे पाठीच्या बाजूला झुकवावी. यामुळे तोंडातली जीभ वर जाऊन श्वासोच्छ्वास सुरू राहील. आवश्यकता असल्यास तोंडाने श्वासोच्छ्वास करावा. त्या व्यक्तीला हवा मारत राहावी व तातडीने रुग्णालयात दाखल करावे.-डॉ. राजेंद्र जगताप, संचालक,
राज्य शासन मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस

गिझर बसविताना...
४बाथरूममध्ये व्हेंटिलेशनसाठी पुरेशी जागा ठेवा.
४गॅस गिझरमध्ये गॅस जळताना निर्माण होणारे विषारी गॅस बाहेर पडण्यासाठी उपाययोजना करा.
४सिलिंडर बाथरूममध्ये ठेवू नका.
४सिलिंडर व गिझर यामधील पाईपचे स्टॅण्डर्ड पाळा.
४गॅसगळती होत असल्यास सिलिंडरचा कॉक तातडीने बंद करा.
४बाथरूममध्ये व्हेंटिलेशन नसेल तर दरवाजा बंद करू नका.
४गॅस गिझर चांगल्या कंपनीचे, मानांकन असलेले घ्या.

गॅस गिझर वापरताना बाथरूममध्ये व्हेंटिलेशन असणे गरजेचे आहे. सिलिंडर कधीही बाथरूममध्ये ठेवू नका, तो बाहेर ठेवावा. मात्र जास्त लांब ठेवू नका. गॅससाठी किती पाईप वापरावा याचे स्टॅण्डर्ड ठरवून देण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
-शरीफ अत्तार, गॅस गिझर विक्रेते

सुरक्षेकडे दुर्लक्ष
शहरात गॅस गिझरला मोठी मागणी आहे. मात्र गॅस गिझरबाबत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय काळजी घ्यायला हवी, याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे.

Web Title: Model of the 'Sankalpa' of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.