शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

हातचलाखीने अंगठी चोरणारी मॉडेल गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 15:44 IST

सराफी पेढीमधून हातचलाखीने अंगठी चाेरणाऱ्या माॅडेलला पाेलिसांनी अटक केली आहे.

पुणे : उच्चभ्रू राहणीमान असलेली एक तरुणी ज्वेलर्सच्या दुकानात आली. तिने काही दागिने पाहिले व त्यानंतर नापसंत असल्याचे सांगत निघून गेली. तिच्याकडे पाहून कोणीही ही चोरी करेल, असे वाटले नव्हते. पण जेव्हा सीसीटीव्हीची पाहणी करण्यात आली तेव्हा या तरुणीने १० ग्रॅम वजाच्या ५० हजार रुपये किंमतीच्या २ सोन्याच्या अंगठ्या चोरुन नेल्याचे आढळून आले. गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने या तरुणीला ताब्यात घेतले तेव्हा ती मॉडेल असल्याचे समाेर आले. स्रेहलता ऊर्फ स्रेहल ऊर्फ साक्षी पाटील (वय २५, रा़ कोथरुड) असे तिचे नाव आहे. तिला एनआयबीएम रोडवरील क्लोव्हर प्लाझा मॉलमधून पोलिसांनी ताब्यात घेतले. लष्कर भागातील सेंट्रल स्ट्रीटवरील खरी पेढी ज्वेलर्समध्ये ही तरुणी २० जानेवारी रोजी आली होती. खरेदीचा बहाणा करुन तिने दोन अंगठ्या चोरुन नेल्या होत्या. लष्कर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरु होता. पोलीस नाईक मोहसीन शेख यांना हा गुन्हा स्रेहलता पाटील हिने केल्याची माहिती मिळाली. बातमीची सत्यता पडताळून पाहत असताना स्रेहलता ही एनआयबीएम रोडवरील क्लोव्हर प्लाझा मॉलमध्ये आली असल्याची माहिती मिळाली. तिला तेथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत प्रथम तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांनतर तिने गुन्ह्याची कबुली दिल्यावर तिला अटक करण्यात आली. स्रेहलला पाटील ही सध्या मॉडेलिंग क्षेत्रात करीअर करीत आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंग, सहायक आयुक्त डॉ़ शिवाजी पवार, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, सहायक फौजदार यशवंत आंब्रे, महिला हवालदार मोहिते, ढेबे, मोहसीन शेख, गोपाळ मदने यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेWomenमहिला