मोक्का दाखल करताना नंबर गेम नव्हे गरज पाहतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:25 IST2021-09-02T04:25:52+5:302021-09-02T04:25:52+5:30
--- लोणी काळभोर : मोक्कासंदर्भातील गुन्हे किती दाखल करायचे याबाबत आम्ही नंबर गेम करत नाही, जशा केसेस येतील त्याच्या ...

मोक्का दाखल करताना नंबर गेम नव्हे गरज पाहतो
---
लोणी काळभोर : मोक्कासंदर्भातील गुन्हे किती दाखल करायचे याबाबत आम्ही नंबर गेम करत नाही, जशा केसेस येतील त्याच्या मेरिट आणि गरजेप्रमाणे मोक्का दाखल करतो. त्यावेळी किती केसेस झाले याचा विचार नसतो, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले. मोक्का कायद्याअंतर्गत ५० गुन्हे दाखल झाल्याबद्दल पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील महिला कर्मचारी विश्रांती कक्षाचे उद्घाटन पोलीस आयुक्त गुप्ता यांच्या हस्ते झाला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सहआयुक्त रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, परिमंडळ ५ पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, हडपसर विभाग सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, भारत पेट्रोलियम कार्पोरेशनचे मुख्य प्रबंधक राहुल सूर्यवंशी, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, सुनील जैतापुरकर, सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, श्रीशैल चिवडशेट्टी, उपनिरीक्षक, जयंत हंचाटे, अमृता काटे, दिगंबर बिडवे, प्रमोद हंबीर, संतोष शेंडगे उपस्थित होते.
आयुक्त गुप्ता म्हणाले की, पुणे पोलीस आयुक्तालयाला चार महिन्यांपूर्वी लोणी काळभोर पोलीस ठाणे जोडण्यात आले. त्यावेळी या पोलीस ठाण्यात सुविधांचा वणवा होता. हे लक्षात येताच सीएसआरच्या माध्यमातून महिला कर्मचारीसाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष बांधण्यात आला आहे. याचबरोबर येथे शहरातील ठाण्यांत उपलब्ध असलेल्या आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावर शेवाळेवाडी ते लोणी स्टेशन दरम्यान दुतर्फा वाहतूक पोलीस रस्त्यात आडवे होऊन वाहन चालकांवर कारवाई करत असल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणारांवर ते कारवाई करत असतात. परंतु वाहतूक पोलीस महामार्गावर आडवा येऊन वाहन चालकांवर कारवाई करत असेल तर त्यांचेविरोधात तक्रार दाखल करावी. त्याचेवर कारवाई केली जाईल.
--
फोटो क्रमाक : ०१ मोक्का दाखल
फोटो ओळी : महिला कर्मचारी विश्रांती कक्षाचे उद्घाटन करताना पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व इतर अधिकारी.