शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

जबरी चोरी, घरफोडी आणि वाहनचोरी करणा-या गुन्हेगारांच्या टोळीवर 'मोक्का' ; तब्ब्ल ८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 17:54 IST

राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हे दाखल

ठळक मुद्देस्वतःच्या आणि टोळीच्या आर्थिक फायद्याकरिता राज्यभर पसरवली दहशत

पुणे: जबरी चोरी, घरफोडी आणि वाहनचोरी करणा-या गुन्हेगारांच्या टोळीवर गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन विरोधी पथकाने मोक्का कारवाई केली आली. आरोपींकडून वाहने आणि जबरी चोरीतील ८ लाख ४६ हजार १०० रूपयेकिंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हे दाखल आहेत. 

अजिनाथ लक्ष्मण गायकवाड (वय २४, रा. हडपसर), नागेश मनोहर वाकडे (वय २१, रा.  हडपसर), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ९ एप्रिलला फिर्यादी हे महम्मदवाडी हडपसर येथून दुचाकीने घरी चालले असता अजिनाथ गायकवाड व नागेश वाकडे यांच्या तीन साथीदारांनी दुचाकीवरून फिर्यादीच्या मागे येत त्यांच्या दुचाकीला कट दिला. त्यांना थांबवून कोयत्याचा धाक दाखवत शिवीगाळ करून फिर्यादीच्या खिशातील १२०० रूपये, ११०० रूपयांची चांदीची अंगठी असे हिसकावून पळून गेले. याप्रकरणी फिर्यादी यांनी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

दरोडा व वाहन विरोधी पथक २ गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप यांनी या गुन्हयाचा तपास सुरू केला. या गुन्हयात दोघांना अटक करण्यात आली. जिल्हयात आणि महाराष्ट्रातील इतर जिल्हयात संघटितपणे गुन्हे करून दहशत पसरून स्वत:च्या आणि टोळीच्या आर्थिक फायद्याकरिता खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरी, बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण करणे, मालमत्तेचे नुकसान करणे अशा प्रकारचे गुन्हे नोंद आहेत. दोन्ही आरोपींवर अनुक्रमे १५ आणि ३ गुन्हे दाखल आहेत. दरोडा व वाहन विरोधी पथक २ चे पोलीस उपनिरीक्षक सुनील पंधरकर यांनी आरोपींवर दाखल गुन्हयात मोक्का कलमांचा समावेश करावा असा अहवाल पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाटगे यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्याकडे सादर केला होता. त्याला मान्यता देत आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रशासन सुधाकर यादव करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक