शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

पुण्यातील नाट्यगृहांमध्ये लागणार ‘मोबाइल सायलेंट मोडवर ठेवा’चे फलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 12:08 IST

अभिनेता सुबोध भावे यांनी नाट्यप्रयोगादरम्यान मोबाइल खणखणण्याच्या त्रासावर संताप व्यक्त करत, यापुढे नाटकात काम न करण्याचा विचार जाहीर बोलून दाखवला होता..

ठळक मुद्दे नाट्य व्यवस्थापनाने घेतला निर्णय

पुणे : अभिनेता सुबोध भावे यांनी नाट्यप्रयोगादरम्यान मोबाइल खणखणण्याच्या त्रासावर संताप व्यक्त करीत, यापुढे नाटकात काम न करण्याचा विचार जाहीर केल्यानंतर आता नाट्य व्यवस्थापनाकडून देखील प्रेक्षकांच्या प्रबोधनाच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. त्यानुसार पुण्यातील नाट्यगृहांमध्ये  ‘मोबाइल सायलेंट मोडवर ठेवा’चा संदेश देणारे फलक लावले जाणार आहेत. महापालिकेच्या नाट्यगृह व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता सुबोध भावे यांनी प्रेक्षकांची काहीशी कानउघाडणी करणारी खरमरीत पोस्ट  सोशल मीडियावर टाकली होती. नाटकात काम न करण्याचा विचार त्यांनी उद्विग्न भावनेतून बोलून दाखविला होता. त्यामुळे नाट्य वर्तुळात खळबळ उडाली. सोमवारी भावे यांनी स्वत:च पुढाकार घेत बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहामध्ये झालेल्या ‘अश्रूंची फुले’नाटकादरम्यान ‘मोबाइल फोन सायलेंट मोडवर ठेवा’ असे सांगणारा फलक ठळकपणे लावला होता. सुबोध भावे व नाटकातले दोन सहकलाकार स्वत: उभे राहुन प्रेक्षकांना मोबाइल फोन बंद ठेवण्याचे आवाहन करत होते. डोअर कीपरदेखील प्रेक्षकांना मोबाइल बंद ठेवण्यास सांगत होते. तसाच प्रयोग आता पुण्यात पालिकेच्या बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण या नाट्यगृहांसह इतर नाट्यगृहांमध्ये केला जाणार आहे.  नाट्यगृहांमध्ये ‘मोबाइल सायलेंट मोडवर ठेवा, असे सांगणारा फलक दोन दिवसात लावण्यात येईल. तसेच  राज्यातील नाट्यगृहांच्या अडचणींसंदर्भात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोºहे यांनी गेल्या आठवड्यात व्यवस्थापकांची बैठक घेतली. नाट्यगृहात जॅमर लावता येईल का? मोबाइल फोनसाठी लॉकर उपलब्ध करून देता येतील का? यावर तसेच नाट्यगृहांच्या विविध अडचणींवर चर्चा झाली. जॅमर लावणे व्यवहार्य नाही. शहरातील नाट्यगृहांना भेडसावणाºया अडचणींसंदर्भात भवन विभाग आणि वरिष्ठ अधिकाºयांशी सतत चर्चा सुरू असल्याचे रंगमंदिराचे व्यवस्थापक सुनील मते यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेSubodh Bhaveसुबोध भावे TheatreनाटकBal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिर