शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

Video : संदीप देशपांडेंच्या ट्विटला रुपाली ठोंबरे पाटलांचं एका वाक्यात प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 13:03 IST

मनसेप्रमुखराज ठाकरे (Raj Thackeray) बुधवारपासून पुणे दौऱ्यावर आहेत. परंतु त्याआधीच रुपाली पाटील-ठोंबरे यांनी मनसेला 'जय महाराष्ट्र' केल्याने राजकारणात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

ठळक मुद्देसंदीप देशपांडे असतील किंवा आणखी कुणी असेल, आम्ही भावंडं बनून पक्षात काम केलंय. त्यामुळे, मी आत्ता त्यांना उत्तर देणं म्हणजे त्यांना आणखी दुख देण्यासारखं आहे.

पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष रुपाली पाटील-ठोंबरे  (Rupali Patil Thombre) यांनी आपला सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर, आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपल्या राजीनाम्याचं वैयक्तिक कारण असल्याचं स्पष्ट केलं. तसेच, स्वत:मध्ये बदल व्हावा, यासाठीच आपण मनसेला रामराम केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी, संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन केलेल्या टिकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलंय. 

मनसेप्रमुखराज ठाकरे (Raj Thackeray) बुधवारपासून पुणे दौऱ्यावर आहेत. परंतु त्याआधीच रुपाली पाटील-ठोंबरे यांनी मनसेला 'जय महाराष्ट्र' केल्याने राजकारणात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. रुपाली पाटील-ठोंबरे यांच्या राजीनाम्यानंतर मनसेचे संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली. मी 14 वर्षे मनसेत काम केलंय, राजकारणात काम कसं करायचं हे मी या पक्षातच राहून शिकले आहे. मात्र, वैयक्तिक कारणासाठी मी पक्षातून बाहेर पडत आहे. नवीन कोणत्या पक्षात प्रवेश घेणार हे अद्याप ठरवलेलं नाही. पण, अनेक पक्षांमधून ऑफर आहेत, असेही पाटील यांनी सांगितले. तसेच, मनसचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन केलेल्या टिकेलाही त्यांनी प्रत्त्युतर दिलंय. 

संदीप देशपांडे असतील किंवा आणखी कुणी असेल, आम्ही भावंडं बनून पक्षात काम केलंय. त्यामुळे, मी आत्ता त्यांना उत्तर देणं म्हणजे त्यांना आणखी दुख देण्यासारखं आहे. मीही त्यांचीच बहिण आहे, त्यांच्याच सोबत वाढलीय, त्यामुळे त्यांना दु:ख झालं असेल. योग्यवेळी मी त्यांना उत्तर देईल, असे एका वाक्यातील प्रत्युत्र ठोंबरे पाटील यांनी दिले.  

स्वत:मध्ये बदल करायचाय

पक्षात बदल होत नसेल तर मला स्वत:मध्ये बदल करुन घ्यावा लागेल. मात्र, मनसेत काय बदल व्हावा हे सांगण्याइतपत मी मोठी नाही, ते राज ठाकरेच ठरवतील, असे रुपाली ठोंबरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले. तसेच, मी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, हा माझा वैयक्तिक निर्णय आहे, असेही ठोंबरे यांनी म्हटलं.  काय म्हणाले संदीप देशपांडे

मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्वीट केलं आहे. "सूर्य तळपतील चंद्र झळकतील। तारे अपुला क्रम आचरतील।। असेच वारे पुढे वाहतील। जन पळभर म्हणतील, 'हाय हाय!'" असं देशपांडे यांनी म्हटलं आहे. रूपाली पाटील या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. तसेच मनसेच्या महिला विभागाच्या पुणे शहराध्यक्ष म्हणून त्या कार्यरत होत्या. मंगळवारी त्यांनी आपला राजीनामा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सादर केला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून त्यांना ऑफर असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :MNSमनसेSandeep Deshpandeसंदीप देशपांडेPuneपुणेRaj Thackerayराज ठाकरे