शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मनसेमधील अंतर्गत धूसफूस वाढली; नगरसेवक वसंत मोरे पक्षाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून लेफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 09:40 IST

पक्षबांधणीसाठी बनवलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये मतभेद दिसून येत असल्याने तसेच चर्चा टाळण्यासाठी वसंत मोरेंनी ग्रुप सोडल्याचे सांगण्यात येत आहे. 

पुणे- मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू असा इशारा मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात दिला होता. त्यानंतर पुणे शहराध्यक्ष व नगरसेवक वसंत मोरे यांनी त्यावर ठाकरे यांच्या भाषणामुळे आपण बेचैन असल्याचे मत व्यक्त केले. प्रभागातील काही मुस्लीम मतदारांनी ते भयग्रस्त झाले असल्याचेही आपणाला सांगितले. एका शाखाप्रमुखाने राजीनामा दिला, असेही मोरे यांनी जाहीर केले.

राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे पुण्यातील एका मुस्लिम पदाधिकाऱ्याने देखील पक्षाचा राजीनामा दिला होता. तसेच राज्यातील अनेक मुस्लिम पदाधिकारी राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर येत आहे. 

एका मराठी वृत्तवाहिनीच्या वृत्तानूसार, पुणे शहराध्यक्ष व नगरसेवक वसंत मोरे यांनी मनसेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून बाहेर (लेफ्ट) पडल्याची माहिती समोर येत आहे. उपविभाग प्रमुख, उपशहर प्रमुख या ग्रुपमधून वसंत मोरे यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षबांधणीसाठी बनवलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये मतभेद दिसून येत असल्याने तसेच चर्चा टाळण्यासाठी वसंत मोरेंनी ग्रुप सोडल्याचे सांगण्यात येत आहे. 

राज ठाकरे यांनी पुण्यातील महत्वाच्या नेत्यांना आज शिवतिर्थावर बोलावले आहे. मात्र मनसेचे नगरसेवक आणि पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना निमंत्रण न दिल्याची माहिती समोर येत आहे. राज ठाकरेंनी पुण्यातील मनसेचे नेते राजेंद्र वागसकर, अनिल शिदोरे आणि मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांना मुंबईत बोलावलं आहे. मात्र पुण्यातील मनसेतील मोठं नाव असलेल्या वसंत मोरे यांना निमंत्रण न दिल्याचं सांगण्यात येत आहे. 

दरम्यान, राज ठाकरे यांच्या भाषणामुळे अन्य राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडणे, त्यांनी टीका करणे समजण्यासारखे आहे, मात्र पक्षाच्याच नगरसेवकांनी त्या भाषणामुळे मी बेचैन आहे असे म्हणणे योग्य नाही, असे मत मनसेचे नेते राजेंद्र वागसकर यांनी सांगितले. ९ मार्चला ठाण्यात आयोजित सभेत खुद्द पक्षाध्यक्ष राज ठाकरेच त्यावर बोलणार आहेत, त्यातून मोरे यांचे समाधान होईल, असे ते म्हणाले.

वागसकर यांनी त्यावर बोलताना कोणत्याही पक्षात संघटना, लोकप्रतिनिधी असे वेगळे काहीही नसते. पक्षाध्यक्षांचा आदेश महत्त्वाचा असतो व कार्यकर्त्यांनी, लोकप्रतिनिधींनी त्याचे पालन करायचे असते, असे स्पष्ट केले. मोरे यांच्या भावनांची दखल राज ठाकरे घेतील. याच विषयावर राज्यातील अन्य राजकीय पक्षांनीही बरेच भाष्य केले आहे. त्यामुळेच ९ मार्चला ठाण्यात पक्षाध्यक्ष ठाकरे यांची सभा होणार असून ते स्वत:च या सर्व गोष्टींना उत्तर देतील, असे वागसकर म्हणाले.

राज ठाकरेंवर नाराज नाही, मात्र बेचैन आहे- वसंत मोरे

मी शहराध्यक्ष असलो तरी एक लोकप्रतिनिधी आहे, माझ्या प्रभागातील मुस्लिम मतदार नाराज होत असतील, भयग्रस्त होत असतील तर मला त्याची काळजी करायलाच हवी. राज ठाकरेंवर नाराज नाही, मात्र बेचैन आहे, प्रत्यक्ष त्यांची भेट घेऊन यावर बोलेन असेही मोरे म्हणाले होते.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPuneपुणे