शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Amit Thackeray: "मी संजय राऊतांची रिप्लेसमेंट नाही बरं का...", अमित ठाकरे असं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 13:41 IST

मनसेच्या विद्यार्थी संघटनेच्या पुनर्बांधणी निमित्तानं मनसे नेते अमित ठाकरे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे यांनी आज पुणे पत्रकार संघ येथे मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

पुणे- 

मनसेच्या विद्यार्थी संघटनेच्या पुनर्बांधणी निमित्तानं मनसे नेते अमित ठाकरे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे यांनी आज पुणे पत्रकार संघ येथे मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर प्रसारमाध्यमांनाही प्रतिक्रिया दिली. राज्यातील तरुणाईच्या रोजगाराचा आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा मानस अमित ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. पण मनसेच्या एका कार्यकर्त्यांनं विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात अमित ठाकरेंनी दिलेलं उत्तर लक्षवेधी ठरलं आहे. 

...तर राजकारणात कधीच आलो नसतो; अमित ठाकरेंनी युवकांना स्पष्टच सांगितले

अमित ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पण या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी किंवा सामान्य जनतेशी थेट संवाद साधताना दिसत नाहीत. तुम्ही बातमी द्यायला हवी, अशी भावना एका मनसे कार्यकर्त्यानं अमित ठाकरेंकडे व्यक्त केली. त्यावर अमित ठाकरेंनी संजय राऊत सगळं पुरवतात ना? असं म्हटलं. पण संजय राऊत सध्या तुरुंगात आहेत असं मनसेच्या कार्यकर्त्यानं उत्तर दिलं. त्यावरही लागलीच अमित ठाकरेंनी मिश्किलपणे ''मी संजय राऊतांची रिप्लेसमेंट नाही बरं का'', असं म्हटलं.

"राज्यकर्त्यांनी खरंतर सगळ्याच प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवं. पण सध्या काहीच होत नाहीय. मी विद्यार्थ्यांसाठी फिरतोय. त्यांच्याशी संवाद साधतोय आणि त्यांचे प्रश्न जाणून घेतोय", असं अमित ठाकरे म्हणाले. 

विद्यार्थ्यांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवणार"रोजगार, आरक्षण आणि स्पर्धा परीक्षा यात विद्यार्थ्यांना समस्या भेडसावत आहेत. या सोडवण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात मनविसेची शाखा असायला हवी. यामुळं माझा आणि त्यांचा संपर्क व्हायला हवा. त्यासाठी मी सध्या प्रयत्नशील आहे. त्याच अनुषंगानं मी हा दौरा करतोय", असं अमित ठाकरे म्हणाले. 

राज्यात जे सत्ताबदल झालं, त्याबाबद्दल अमित ठाकरेंना काय वाटतं?सत्ता बदलाचे मला काही वाटत नाही. मी बातम्या वाचतच नाही. माझं फोकस क्लिअर आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवायचे. यासाठी मी स्वतः विद्यार्थ्यांना उपलब्ध होईन. यासाठी माझा नंबर त्यांना देतोय, असं अमित ठाकरे म्हणाले. 

सध्याचं राजकारण पाहता युवकांनी राजकारणात का यावं का?"मी पण तेच सांगतोय की, मी जर राज ठाकरेंचा मुलगा नसतो तर राजकारणात कधीच आलो नसतो. मला लोकांसाठी काम करायला आवडतं. पण ही आवड असली तरी सध्याच राजकारण पाहता मी कधीच राजकारणात आलो नसतो. मात्र माझ्यासाठी राज साहेबांनी प्लॅटफॉर्म तयार करून दिलंय. त्यामुळे दौरे करतोय अन युवकांचा प्रतिसाद मिळतोय", असं अमित ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Amit Thackerayअमित ठाकरेMNSमनसेSanjay Rautसंजय राऊत