शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मनसेप्रमुख राज ठाकरे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर; महापालिका निवडणुकांची रणनीती ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 15:59 IST

मनसेतील अंतर्गत गटबाजी दूर करण्यासोबतच कार्यकर्त्यांशी संवाद साधणार...

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे. त्याच अनुषंगाने पुण्यात विविध राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे दौरे देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील महापालिका निवडणुकांची रणनीती आखण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली असून स्वतः पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यात विशेष लक्ष घातले असल्याचे  पाहायला मिळत आहे. 

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गेल्या काही वर्षात पक्षाला आलेली मरगळ झटकण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उमेद वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. मनसेच्या नव्या शहर कार्यालयाच्या उद्घाटनासाठी पुण्यात आलेल्या पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पुण्याला पुन्हा आणखी तीन दिवस दिले आहेत. या तीन दिवसीय दौ-यात विधानसभानिहाय बैठका घेतल्या जाणार आहेत. 

मनसेला २०१२ झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये पुणेकरांनी साथ देत तब्बल २९ नगरसेवक निवडून दिले होते. मात्र, २०१७ साली झालेल्या निवडणुकीत ही संख्या अवघी दोन नगरसेवकांवर आली. पक्षाच्या संघटनात्मक कामातही मोठ्या प्रमाणावर मरगळ आली होती. स्थानिक पदाधिका-यांच्या अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरलेली होती. ही गटबाजी विधानसभा निवडणूक आणि पदवीधर निवडणुकीमध्येही प्रकर्षाने समोर आलेली होती. पक्षाचे नेतृत्वही संघटनात्मक बांधणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पदाधिकारी खासगीत बोलत होते.

विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला चमकदार कामगिरी करता आली नाही. आता, पालिका निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद आजमावण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्यातील बारा ते चौदा महापालिकांच्या संभाव्य निवडणुकांसाठी मनसेने पुन्हा जोरदार तयारी सुरु केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आता राज्यभर दौरे करु लागले आहेत. नाशिकचा दौरा संपल्यानंतर ठाकरे पुणे दौ-यावर येत आहेत.

ठाकरे हे रविवारी सायंकाळी पुण्यात दाखल झाले असून आजपासून पुढील तीन दिवस विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेणार आहेत. तसेच बुधवारी कोरोना काळात उल्लेखनीय काम केलेल्या संस्था आणि व्यक्तींशी चर्चा करून त्यांचा सन्मान करणार आहेत. आगामी निवडणुक आणि संघटनात्मक बांधणीविषयी गांभीर्याने चर्चा केली जाणार असल्याचे मनसे नेते सांगत आहे.===राज ठाकरे हे आज वडगाव शेरी व शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधत असून कोथरूड व खडकवासला मतदार संघातील कार्यकर्त्यांशी बोलणार आहेत. मंगळवारी सकाळी हडपसर व कॅन्टोन्मेंट मतदार संघ, तर दुपारी कसबा व पर्वती मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जाणार आहेत. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाRaj Thackerayराज ठाकरेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका