शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
2
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
3
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
4
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
5
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
6
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
7
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
8
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
9
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
10
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
11
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
12
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
13
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
14
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
15
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
16
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
17
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
18
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
19
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
20
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?

अजित पवारांना पुन्हा धक्का; आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट, कोल्हेंच्या घरी खलबतं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 10:38 IST

शरद पवार यांनी आज सकाळी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी भेट दिली.

Atul Benke ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय वारे उलट्या दिशेने वाहण्यास सुरुवात झाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वीच पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी अजित पवारांची साथ सोडत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला असतानाच आता आणखी एक आमदार पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं दिसत आहे.  जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे.

शरद पवार हे आज उत्तर पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांनी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके हेदेखील तिथे दाखल झाले आणि त्यांनी पवार यांची भेट घेत चर्चा केली. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आमदार बेनके यांनी सहा महिने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. मात्र नंतरच्या काळात त्यांनी अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला. परंतु लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघात अजित पवारांना मोठा धक्का बसला आणि शरद पवारांच्या पक्षाचे अमोल कोल्हे पुन्हा खासदार झाले. बेनके यांच्या जुन्नर विधानसभा मतदारसंघातूनही कोल्हे यांनी मोठं मताधिक्य घेतलं होतं. या पार्श्वभूमीवर आता अतुल बेनके पुन्हा एकदा शरद पवारांच्या आश्रयाला जाण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. 

दरम्यान, अतुल बेनके यांनी पक्षांतर करत आगामी काळात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यास त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. 

अजित पवारांसाठी धोक्याची घंटा

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने लढवलेल्या १० पैकी ८ जागांवर विजय मिळवला, तर अजित पवारांच्या पक्षाला अवघी एक जागा जिंकता आली. त्यामुळे अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांची धाकधूक वाढली असून यातील अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शरद पवारांच्या पक्षाकडून केला जात आहे. अशातच आता भेटीगाठींचा जोर वाढल्याने आगामी काळात ही गळती रोखण्याचं मोठं आव्हान अजित पवार यांच्यासमोर असणार आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसjunnar-acजुन्नरPuneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४