शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

Pune: राष्ट्रवादीच्या आमदाराला मतदारसंघातील ग्रामस्थांनीच केली 'गावबंदी'; बदनामी केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 18:01 IST

वाबळेवाडी ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा व पालकसभा घेऊन गावबंदीचा निर्णय जाहीर केला...

शिक्रापूर (पुणे) :शिरुर तालुक्यातील वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेची चुकीची माहिती विधानसभेत देऊन शाळेची बदनामी केल्याचा आरोप करत आमदार अशोक पवार यांना वाबळेवाडी ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा व पालकसभा घेऊन गावबंदीचा निर्णय जाहीर केला.

वाबळेवाडी शाळाप्रकरणी आज ग्रामस्थांनी तातडीने पालकसभा घेत आमदार अशोक पवार यांनी विधानसभेत शाळेचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने मांडल्याचा आरोप करत त्यांचा निषेध केला. यापुढे वाबळेवाडीप्रकरणी पुन्हा बोलाल तर पुणे-नगर महामार्गावर त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन कारण्याचा इशाराही महिलांनी यावेळी दिला.

गुरुवारी राज्याच्या विधानसभा अधिवेशनात आमदार अॅड. अशोक पवार यांनी वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेत सर्रास २५ हजार प्रवेश फी घेऊन प्रवेश दिले जातात आणि मुख्याध्यापकांसह बाहेरील दोन व्यक्ती हे पैसे स्वीकारतात. याशिवाय सीएसआरमार्फत होणाऱ्या कामाच्या फंडाचा हिशोब जिल्हा परिषदेला देत नसल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय वाबळेवाडीची दहा-वीस मुले शाळेत असून, उर्वरित मुले धनदांडग्यांची आहेत, असे ते म्हणाले होते. ही सर्व माहिती राज्याची दिशाभूल करणारी व शाळेची अब्रू काढणारी विधानसभेत त्यांनी मांडल्याचे आरोप करत पालकांनी व ग्रामस्थांनी आज पालकसभा घेऊन आमदार पवार यांचा निषेध करत त्यांना गावबंदी करण्याचा निर्णय जाहीर केला.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप वाबळे, मल्हारी वाबळे, सतीश वाबळे, आबा वाबळे, नीलेश दिघे, मीनाक्षी चौधरी, सखुबाई वाबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे, बापू वाबळे, निवृत्ती वाबळे, सतीश कोठावळे, सुरेखा वाबळे, माजी सरपंच केशवराव वाबळे, डॉ. गणेश वाबळे, नानासाहेब वाबळे, वाबळे, कृष्णा सासवडे, कुंडलिक वाबळे, रेश्मा वाबळे, मल्हारी वाबळे, ताराबाई वाबळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसvidhan sabhaविधानसभाShirurशिरुर