जिल्हास्तरीय समितीवर आमदार अशोक पवार व संजय जगताप यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:12 IST2021-04-01T04:12:32+5:302021-04-01T04:12:32+5:30
लोणी काळभोर : गरीब व निर्धण रुग्णांना पुणे शहरासमवेत जिल्हातील चॅरिटी धर्मदाय रुग्णालयात मोफत उपचार मिळावेत व ...

जिल्हास्तरीय समितीवर आमदार अशोक पवार व संजय जगताप यांची निवड
लोणी काळभोर : गरीब व निर्धण रुग्णांना पुणे शहरासमवेत जिल्हातील चॅरिटी धर्मदाय रुग्णालयात मोफत उपचार मिळावेत व या योजनेची अंमलबजानणी योग्य रितीने व्हावी यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची जिल्हास्तरीय समिती बनविण्यात आली आहे. या समितीवर शिरुर - हवेलीचे आमदार अशोक रावसाहेब पवार व पुरंदरचे आमदार संजय चंदुकाका जगताप यांची सदस्य म्हणुन निवड करण्यात आली आहे. रुबी, जहांगीर, केईएम, दीनानाथ मंगेशकर, पूना, बुधराणी, सह्याद्री, तसेच लोणी काळभोर येथील विश्वराजसह पुणे शहरात सुमारे ६० खासगी लहान - मोठी आणि मध्यम स्वरूपांची धर्मदाय रुग्णालये आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण नफ्याच्या तुलनेत २ टक्के रक्कम गरीब व निर्धण रुग्णांवर खर्च करण्याचे बंधन या रुग्नालयावर आहे. परंतू रुग्णांलये अशा रुग्णांना दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करतात. यावर निर्बंध यावेत यासाठी राज्यस्तरावर अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित्या बनविण्यात आलेल्या आहेत.रुग्णालयात वार्षिक उत्पन्न ८५ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या व्यक्ती आणि वार्षिक उत्पन्न १ लाख ६० हजार पर्यंत उत्पन्न असलेल्या दुर्बल घटकातील व्यक्तींच्यावर मोफत उपचार करणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र बहुतांश रुग्नालयात वरील प्रवर्गातील अनेक रुग्णांना बरेचदा दाखल करून घेतले जात नाही.