एमआयटी एडीटी विद्यापीठ आणि स्कील लीन्क कंपनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:26 IST2021-01-13T04:26:40+5:302021-01-13T04:26:40+5:30
या सामंजस्य करारावर एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड आणि स्कील लीन्कचे सीईओ सुर्यानारायण पनीरसेल्वम ...

एमआयटी एडीटी विद्यापीठ आणि स्कील लीन्क कंपनी
या सामंजस्य करारावर एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड आणि स्कील लीन्कचे सीईओ सुर्यानारायण पनीरसेल्वम यांनी स्वाक्षरी केली. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू अनंत चक्रदेव, स्कूल ऑफ इंजीनिअरिंगचे प्राचार्य डॉ. किशोर रवांदे, स्कूल ऑफ इंजीनिअरिंगच्या अधिष्ठाता डॉ. रजनीश कौर सचदेव, डॉ. सुदर्शन सानप, प्रा. सुराज भोयर, डॉ. विरेंद्र भोजवानी, डॉ. सचिन पवार, प्रा. प्रमोद चौधरी, डॉ. संदीप थोरात, डॉ. भुवनेश्वर पटले, डॉ. मॅथ्यु करविनकोप्पा आणि रोहित मोरे आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, एमआयटी एडीटी विद्यापीठ उद्योगांच्या सहकार्याने अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबद्ध आहे. सूर्यनारायण पनीरसेल्वम म्हणाले की, स्कील-लिन्क सध्याच्या आणि भविष्यातील तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम तयार करुन उद्योगसमूहासाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळ तयार करत आहेत.