शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

पोलीस परवानगीचा घोळ :चुका पोलिसांच्या; मनस्ताप मात्र नागरिकांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 2:08 AM

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे रीतसर आॅनलाईनवर परवानगी मागितली.

पुणे  - गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे रीतसर आॅनलाईनवर परवानगी मागितली़ पण, दोन पोलीस ठाण्यांनी ऐनवेळी वेगवेगळ्या मार्गाने मिरवणूक नेण्यासाठी परवानगी दिली़ पोलिसांमधील समन्वयाअभावी मिरवणूक वेगळ्या मार्गाने नेल्याबद्दल व वाहतुकीला अडथळा आणल्याबद्दल उलट डेक्कन पोलिसांनी या कंपनीचे प्रमुख व त्यांच्या कर्मचाºयांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक देऊन कारवाई करून त्यांच्यातील दहा जणांना अटक केली़याबाबत अभि इॅम्पॅक्ट लॉजिस्टिक्स सोल्युशन या कंपनीचे प्रमुख जितेंद्र जोशी त्यांनी आपल्यावर व कर्मचाºयांवर बेतलेल्या या प्रकाराची माहिती दिली़ त्यांनी सांगितले, की आमची देशभर कार्यालये असून सुमारे ६ हजार कर्मचारी काम करतात़ आमच्या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी आम्ही १ सप्टेंबर रोजीच पोलिसांकडे आॅनलाईन अर्ज केला होता़ परंतु १८ सप्टेंबरपर्यंत कोणतीही परवानगी मिळाली नाही़ तेव्हा चतु:शृंगी पोलीस ठाण्यात जाऊन आमच्या कर्मचाºयाने त्यांच्याकडून मिरवणूक मार्गाची परवानगी आणली़ त्यात जनवाडी, दीप बंगला, ज्ञानेश्वर पादुका असा मार्ग देण्यात आला होता़ ज्ञानेश्वर पादुकांच्या पुढे त्यांनी मार्गच दिला नाही़ आता तेथे गणेश विसर्जनाची कोणतीही सोय नाही़ विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी डेक्कन पोलीस ठाण्यातून परवानगीसाठी फोन आला़ तेव्हा आमचा एक कर्मचारी तेथे गेला़ त्यांनी दुपारी साडेतीन वाजता जनवाडी, सिम्बायोसिस अशा दुसºयाच मार्गाची परवानगी दिली़ तोपर्यंत आमची मिरवणूक दीप बंगला चौकात आली होती़ ती पुन्हा उलटी नेणे शक्य नसल्याने आम्ही ज्ञानेश्वर पादुका चौकातून फर्ग्युसन रोड व तेथून शिरोळे रोडला मिरवणूक आणली़ शिरोळे रोडला मिरवणूक आली तेव्हा ढोल पथकाने वादन थांबवून ढोल पाठीवर घेतले होते़ अनेक जण आपापल्या गाडीवर घाटावर जात होते़ त्यावेळी डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत भट व त्यांचे सहकारी तेथे आले़ त्यांनी स्पीकर व जेवणाची गाडीही जप्त केली़ तेव्हा त्यांनी आमचे मोबाईल काढून घेतले़ रात्री उशिरा आम्हाला समन्स देऊन घरी सोडले व दुसºया दिवशी न्यायालयात बोलावले़ पण पोलीस आलेच नाहीत.आम्ही कोणी गुन्हेगार नाही़ पोलिसांनी अगोदर दिलेल्या आदेशानुसारच मिरवणूक काढली होती़ आता त्यांच्या दोन पोलीस ठाण्यांमध्ये समन्वय नाही़ ऐनवेळी मिरवणुकीची वेळ उलटून गेल्यावर दुसºया मार्गाची परवानगी दिली़ या पोलिसांच्या चुका असताना त्याची शिक्षा मात्र आम्हाला दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले़ मिरवणुकीसाठी दिलेला मार्ग बदलला आणि वाहतूक अडथळा आणल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे डेक्कन पोलिसांनी सांगितले़

टॅग्स :Policeपोलिसnewsबातम्या